Saturday, November 23, 2024
HomeराजकीयUlhasnagar Firing | एकनाथ शिंदे यांनी मला गुन्हेगार बनवले…भाजप आमदाराचा खळबळजनक दावा...

Ulhasnagar Firing | एकनाथ शिंदे यांनी मला गुन्हेगार बनवले…भाजप आमदाराचा खळबळजनक दावा…

Ulhasnagar Firing | उल्हासनगरमधील पोलीस स्टेशन मधेच गोळीबारचे घटनेने अवघ्या राज्याला हादरून सोडले. शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडणारे महाराष्ट्र भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी या घटनेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जबाबदार धरले आहे. शुक्रवारी अटक करण्यापूर्वी एका वृत्तवाहिनीशी फोनवर बोलताना गणपत गायकवाड म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी मला गुन्हेगार बनवले…

मुंबईतील कल्याण पूर्वेतील भाजपचे आमदार गणपत गायकवाड म्हणाले, ‘माझ्या मुलाशी पोलीस ठाण्यात गैरवर्तन करण्यात आली आणि माझी जमीन जबरदस्तीने हिसकावून घेण्यात आली. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले तर महाराष्ट्रात फक्त गुन्हेगारच जन्माला येतील. आज त्यांनी माझ्यासारख्या चांगल्या माणसाला गुन्हेगार बनवले आहे.

त्यासोबत ते म्हणाले, ‘शिंदे साहेबांनी उद्धव ठाकरे यांचा विश्वासघात केला. ते भाजपशीही गद्दारी करतील. एकनाथ शिंदेंकडून आपणास कोटयवधी रुपयांचे येणे बाकी आहे. हे त्यांनी एकदा जाहीर करून सांगावे. राज्य गुन्हेगारांपासून वाचवायचे असेल, महाराष्ट्राचे चांगले करायचे असेल तर पंतप्रधान मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, असेही आमदार गायकवाड यांनी म्हटले आहे. गोळीबारामुळे माझी प्रतिमा लोकांसमोर गुन्हेगार म्हणून जाण्यास मुख्यमंत्री शिंदेच जबाबदार आहेत. माझ्यासमोर माझ्या मुलाला मारले जात असेल तर बाप म्हणून ते नुसते पाहून जगण्यात अर्थ काय आहे. मी जो गोळीबार केला त्याचा मला अजिबात पश्चात्ताप नाही. मी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला आहे, असे गायकवाड म्हणाले.

या कारणावरून शिवसेनेच्या नेत्यावर गोळी झाडली!
आपल्या मुलाला पोलीस स्टेशनमध्ये ‘मारहाण’ केली जात आहे आणि त्याचा बदला घेण्यासाठी महेश गायकवाडवर गोळ्या झाडल्याचा आरोप करत भाजप आमदाराने आपल्या कृतीचा बचाव केला. गणपत गायकवाड म्हणाले, ‘मी निराश झालो आणि त्यामुळेच मी गोळीबार केला. मला कशाचाच पश्चाताप नाही. माझ्या मुलाला पोलिस ठाण्यात कोणी मारहाण केली तर मला काय करायला पाहिजे? त्याला मारण्याचा माझा हेतू नव्हता.

पोलिस ठाण्यात गोळीबारामागे जमिनीचा वाद?
गणपत गायकवाड म्हणाले की, जमिनीच्या तुकड्याबाबत काही कायदेशीर अडचणी होत्या, मात्र त्यांनी कोर्टात केस जिंकली होती. असे असतानाही महेश गायकवाड यांनी जबरदस्तीने त्या जागेवर कब्जा केल्याचा आरोप त्यांनी केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणपत गायकवाड यांचा मुलगा शुक्रवारी सायंकाळी जमिनीच्या वादाची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेला असता, महेश गायकवाड आपल्या लोकांसह तेथे पोहोचले. यानंतर गणपत गायकवाड यांनीही पोलीस ठाणे गाठले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, भाजप आमदार आणि शिवसेना नेते यांच्यात वाद झाला आणि गणपत गायकवाड यांनी वरिष्ठ निरीक्षकांच्या चेंबरमध्ये महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला, त्यात ते आणि महेशचा सहकारी राहुल पाटील जखमी झाले.

कल्याणमधील भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शुक्रवारी रात्री उल्हासनगर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या खोलीत महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडून जखमी केले. या घटनेने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. दरम्यान, राज्याच्या गृहखात्याची जबाबदारी असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: