Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीUlhasnagar | १२ वर्षांच्या बहिणीला पहिल्यांदा आली मासिक पाळी...वहिनीने भरले भावाचे कान...संतापलेल्या...

Ulhasnagar | १२ वर्षांच्या बहिणीला पहिल्यांदा आली मासिक पाळी…वहिनीने भरले भावाचे कान…संतापलेल्या भावाने केल ‘हे’ कृत्य…

Ulhasnagar : उल्हासनगरमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे, उल्हासनगरच्या शांतीनगर भागात राहणाऱ्या १२ वर्षीय मुलीची निर्घुण हत्या केल्याची घटना समोर आली. हत्यारा दुसरातिसरा कोणी नसून मृतक मुलीचा मोठा भाऊ असल्याचे समोर आले आहे. यानंतर पोलिसांनी या निर्दयी भावाला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, मृतक मुलगी ही तिचा मोठा भाऊ आणि वहिनीसोबत राहत होती. तिचे आई-वडील गावात राहतात. मुलीला काही दिवसांपूर्वी पहिल्यांदा मासिक पाळी आली. मात्र हे पाहून तिच्या वहिनीने तिच्या भावाला चुकीची सांगून तिच्याविषयी भडकवले. मुलीच्या वहिनीने तिच्या भावाला सांगितले की, तुझ्या बहिणीचे कुठेतरी अफेअर आहे आणि हा रक्तस्त्राव शारीरिक संबंधामुळे झाला आहे.

हे ऐकून मुलीचा मोठा भाऊ संतापला आणि त्याने बहिणीवर ३ दिवस सतत मारझोड करीत राहिला. तिला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करायचा. या मारहाणीमुळे मुलीला गंभीर दुखापत झाली, त्यामुळे दुर्दैवाने 12 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. यानंतर भावाने स्वत: मुलीला मध्यवर्ती जिल्हा रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

मात्र शवविच्छेदन केले असता त्याच्या चेहऱ्यावर, मानेवर, पाठीवर थाप आणि मारहाणीच्या खुणा आढळून आल्या. यानंतर डॉक्टरांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून या निर्दयी भावाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: