सध्या राज्यातील राजकारण कोणत्या स्थराला जात आहे हे राज्यातील जनता बघत असून या मध्ये फक्त एकट्या उद्धव ठाकरेंना खास करून टार्गेट केल जातेय, जेव्हा मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे असतानाचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये ते काश्मिरी पंडित, हिंदुत्व, मराठी, सैनिक याविषयी बोलताना दिसत आहेत. ठाकरे यांनी काश्मीरमध्ये शहीद झालेल्या औरंगजेब या भारतीय सैनिकाबद्दल बोलताना दिसतात. मात्र, उद्धव ठाकरे यांचा अर्धवट Video 28 फेब्रुवारी ला टाकत ‘सर्वात मोठा गद्दार’ म्हणत उद्धव ठाकरे मुघल सम्राट औरंगजेबला शहीद म्हणत असल्याचा दावा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे.
हा Video बनावट असल्याचे निष्पन्न झाले. असून Fact Checker चे मोहम्मद जुबेर यांनी सत्यता पडताळून, नितेश राणे यांना tag केला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरे काश्मीरचे शहीद सैनिक औरंगजेबबद्दल बोलत होते. या व्हिडीओ वर नेटकरी राणेंना चांगलाच सुनावत असल्याचे पाहायला मिळत आहे.