पातुर – निशांत गवई
पातूर तालुक्यातील ग्राम पार्डी येथे त्यागमूर्ती माता रमाआई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका भाग्यश्री ताई इंगळे यांचा भव्य भिम गित गायनाचा कार्यक्रम व मोफत नेत्र,मधुमेह, जनरल फिजिशियन तपासणी शिबीर शनिवार ४ फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत ग्राम पार्डी येथे थाटात संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.मीनाक्षी गजभिये अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सर्वोपचार रुग्णालय अकोला ह्या होत्या तर उदघाटक जि. प.अध्यक्ष संगीताताई अढाऊ या होत्या प्रमुख अतिथी गजानन भाऊ कांबळे महानगर अध्यक्ष री.पा. ई.(आ),आनंद वानखडे जिल्हा महासचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोला,प्रतिभाताई सिरसाट महिला अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी,
पुष्पाताई इंगळे मा.जि. प.अध्यक्ष तथा जि. प.सदस्य, प्राचार्य वाहणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,आकाश सिरसाट शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटी अ.जा.विभाग,जिवन डिगे सामाजिक कार्यकर्ते,आकाश सिरसाट अध्यक्ष सम्राट अशोक सेना,रामराव बोदडे सरपंच कार्ला,मेट्रेन मरीम,राजकुमार सिरसाट जिल्हाउपाध्यक्ष रिपाई,सागर खंडारे जिल्हाध्यक्ष युवा स्वाभिमान पार्टी अकोला ,अमोल जामनिक युवक तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी बार्शीटाकळी,
अनिल अत्तरकार पोलीस पाटील,रमेश बहाकार, सहदेव अत्तरकर,सचिन ढोणे,दिनेश गवई प्रसिद्धी प्रमुख वंचित बहुजन आघाडी पातूर,शरद सुरवाडे,मंगल डोंगरे सदस्य ग्रा.प.शिर्ला,सरपंच संतोष सुरडकर हातोला आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सन्मान पत्र देण्यात आले यावेळी सरपंच नंदा विठ्ठल काळे,सरपंच संतोष तिवाले,राजेंद्र इंगळे उपसरपंच,सरपंच माने,बाळू हिवराळे,प्रकाश अवचार बाबाराव अवचार,
विजय अत्तरकार भाग्यश्री गवई धिरज इंगळे ग्रा.प. सदस्य शिर्ला,शैलेश इंगळे,संतोष गवई व इतर यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन सम्यक नवयुवक मंडळ पार्डी यांनी केले तर स्वागताध्यक्ष नितेश गुलाबराव हिवराळे व निमंत्रक आकाश गुलाबराव हिवराळे होते सूत्रसंचालन विद्याताई भारत आकोड़े यांनी केले तर आभार निलेश हिवराळे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सम्यक नवयुवक मंडळ पार्डी व स्वाधीन बहुद्देशीय संस्था पार्डी यांनी अथक परिश्रम घेतले.