Sunday, November 10, 2024
Homeगुन्हेगारीकुर्कम करणार्‍या दोन युवकांना विस वर्ष सश्रम कारावास, दिव्यांग पिडीतेला मिळाला न्याय...

कुर्कम करणार्‍या दोन युवकांना विस वर्ष सश्रम कारावास, दिव्यांग पिडीतेला मिळाला न्याय…

खामगाव – हेमंत जाधव

बुलढाणा जिल्ह्यातिल खामगाव जिल्हा सत्र न्यायलयाने दिली मतिमंद असलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या नराधमांना विस वर्ष सक्त कारावासाची शिक्षा तदर्थ जिल्हा न्यायधिश 1 तथा सहाय्यक सत्र न्यायधिश श्रीमती पि एस काळे यांनी सुनावली सदर प्रकरणामध्ये प्रत्येकी आरोपीला 15000/-₹ दंड सुनावला सदर दंड न भरल्यास दोन महिने सादी कैद देण्यात आली.

खामगाव शिवाजी नगर पोलिस स्टेशन हद्दी मध्ये येत असलेल्या भागात दि 10/12/2019 रोजी रात्रीच्या दरम्यान आरोपी क्र 1 ज्ञानेश्वर किसन तायडे वय 27 व आरोपी क्र 2 दत्ता श्रीराम साठे वय 36यांनी चाँकलेट चे अमिष देत सदर मतिमंद असलेल्या अल्पवयिन मुलीवर ओसाड जागेवर नेत दुशकर्म करत अत्याचार केला.

सदर प्रकरणात शिवाजी नगर पोलिस स्टेशन चे त्तकालिन ठाणेदार रविद्र देशमुख यांनी तपासाची चक्र फिरवित आरोपींना ताबडतोब अटक भादवी376 डी,376/2 दिव्यांग सुरक्षा नुसार तर पाँस्को कायदा सेक्शन 6 अंतर्गत दि. 11/12/2019 घटना घडल्याच्यारात्रीच गुन्हे दाखल करण्यात आले केली सदर प्रकरणामध्ये तपासी अधिकारी म्हणुन राहुल जगदाळे तर पैरवी अधिकारी म्हणून राजेश ठाकुर सदर प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकिल प्रशांत लाहुडकार यांनी पिडीतेला न्याय देण्याकरिता मुख्य भुमिका पार पाडली या दिव्यांग कन्येला तत्काळ न्याय मिळावा या करिता विराट मल्टिपर्पज फाऊन्डेशनच्यावतिने धरणे आंन्दोलन सुध्दा करण्यात आले होते हे विशेष.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: