Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीकारला पाठीमागून दुचाकीची धडक दुचाकीस्वार गंभीर...

कारला पाठीमागून दुचाकीची धडक दुचाकीस्वार गंभीर…

गोकुळ शिरगाव – पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील किर्लोस्कर कंपनी समोर दुचाकी (क्र. एमएच ०९ झेड ४२९४) वरून भरधाव वेगाने जाणाऱ्या विकी धीरज चव्हाण (वय २४ ( पाडळकर वसाहत, संभाजीनगर) कोल्हापूर याने एस यु व्ही कार (क्र.एम एच १० बीएम ४४४२) या कारला पाठीमागून जोराची धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून या अपघातात दोन्ही वाहनांचे ५५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.निष्काळजीपणे वाहन चालवीत अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी स्वार विकी चव्हाण यांचे विरुद्ध गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून कारचालक बाबुराव धोंडीराम कोरवी (माने नगर, रेंदाळ) यांनी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: