Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीट्रॅक्टर चालणाऱ्या दोघांना कागणरी तांड्यावरून एलसीबी काढून अटक - २,५०,००० चा मुद्देमाल...

ट्रॅक्टर चालणाऱ्या दोघांना कागणरी तांड्यावरून एलसीबी काढून अटक – २,५०,००० चा मुद्देमाल जप्त…

सांगली – ज्योती मोरे

चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याचा आदेश पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांनी दिल्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून तपास चालू असताना खास बातमीदारांने ज्ञानेश्वर विठ्ठल कोरे वय वर्षे 26 आणि राजू सोमराव राठोड वय वर्षे 26 राहणार कागनरी तांडा तालुका जत या दोघांनी चोरी केलेला ट्रॅक्टर आणि ब्लोअर ज्ञानेश्वर कोरे यांच्या घराच्या मागे लावल्याचे सांगितल्यानुसार सदर ठिकाणी छापा टाकून दोन लाख रुपये किमतीचा हिरव्या रंगाचा जॉन डीअर कंपनीचा ट्रॅक्टर आणि पन्नास हजारांचा एक ब्लोर आणि एचटीपी असा एकूण अडीच लाखांचा बुद्धिमान जप्त केलाय.

सदरचा ट्रॅक्टर हा आणखी एक साथीदार अरविंद मल्लू चव्हाण यांच्या साथीने कवठेमंकाळ तालुक्यातील हरोली मधून चोरल्याचे कबूल केलं. सदर मुद्दे मालासह आरोपींना कवठेमंकाळ पोलिसांकडे वर्ग करण्यात आले.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपक गायकवाड,नागेश खरात, दरिबा बंडगर, पोलीस नाईक अनिल कोळेकर, संदीप नलवडे, सागर ठेंगरे, पोलीस शिपाई विक्रम खोत आदींनी केलीय.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: