बुलढाणा – हेमंत जाधव
बुलढाणा – याबाबत सविस्तर वृत्त असे की अप्पर पोलिस अधिक्षक श्री अशोक थोरात यांचे पथक पेट्रोलिंग करत असतांना नांदुरा तालुक्यातील मोमीनाबाद येथे दोन टिप्पर रेती वाहतूक करतांना आढळून आले सदर टिप्पर चालकाला रेती वाहतुकीचा परवाना मागितल्यास परवाना नसल्यामुळे स. पो. नि. सतीश काशीराम आडे अ पो अ कार्यालय खामगाव यांचे फिर्यादीवरून पोलिसांनी दोन्ही टिप्पर क्र MH 28 BB 1590 व दुसरा विना क्र चे चालक सचिन रघुनाथ कंडेलकर वय 29 रा दाताळा ता मलकापूर जी बुलढाणा, शे अन्सार शे शकुर वय 30 रा उमाळी ता मलकापूर जी बुलढाणा यांचे वर अप क्र 548/2023 क, 379 भा दं वि सह क 158/177, 3 (1)/181, 5/180, 50/177 मो.बा.का. नुसार कारवाई करण्यात आली या कारवाईत दोन टिप्पर 3300000 व चार ब्रास रेती 20000 असा अंदाजे 3320000 रु चा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. सुनिल कडासणे साहेब, बुलढाणा यांचे मार्गदर्शनाखाली मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. अशोक थोरात साहेब, खामगांव यांचे आदेशाने अपर पोलीस अधिक्षक साहेब खामगांव यांचे पथकातील सपोनि. सतिष आडे, पो.हे.कॉ. सुधाकर थोरात, निलेश चिंचोळकर, पो. कॉ. शिवशंकर वायाळ, पो. कॉ. हिरा परसुवाले यांनी केली. या कारवाई मुले अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून पोलीस प्रशासनाचे कौतुक होत आहे