Sunday, December 22, 2024
Homeराज्यदोन भामट्यांनी दिला गृहिणीला गुंगारा…चमकवून देतो म्हणून साडेतीन तोळ्याचे दागिने केले लंपास…...

दोन भामट्यांनी दिला गृहिणीला गुंगारा…चमकवून देतो म्हणून साडेतीन तोळ्याचे दागिने केले लंपास… पोलिसांचा तपास सुरू…

आकोट – संजय आठवले

शहरात काल-परवाच चोरीचा असफल प्रयास उघडकीस आल्यानंतर आता दागिने चमकवून देण्याचे निमित्ताने दोन भामट्यांनी एका गृहिणी कडून साडेतीन तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. या घटनेने शहरात असामाजिक तत्त्वांचा मोठा वावर सुरू असल्याचे दिसत असून पोलिसांसह नागरिकांनीही सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. या घटनेची दखल घेऊन आकोट शहर पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे.

या घटनेची हकीगत अशी कि, शहरातील जिजामाता चौकानजीक राहणाऱ्या व्यावसायिक महेंद्र तरडेजा यांचे घरी दुपारी बारा वाजताचे सुमारास एक ईसम आला. यावेळी दुपारचे जेवण वगैरे आटोपून घरातील महिला धान्य निवडण्याचे काम करीत होत्या. त्यांना पाहून या इसमाने आपण कंपनीकडून आल्याचे व घरगुती भांडे तथा दागिने चमकवून देण्याचे काम करीत असल्याचे सांगितले. त्यावर या महिलांनी त्या इसमाला सुरुवातीला नकार दिला. तितक्यात त्याचा आणखी एक साथीदार तिथे आला.

दोघांचेही पेहराव बऱ्यापैकी असल्याने हे कंपनीकडून आल्याचे या महिलांना पटले. या दोघांनीही या महिलांना विश्वासात घेणेकरिता घरातील एक पितळेची थाळी चमकवून दाखविली. ते पाहून गृहस्वामिनीने घराच्या देव्हाऱ्यातील एक लहानशी चांदीची मूर्ती चमकवगण्याकरिता दिली. ती मूर्तीही या भामट्यांनी चमकवून दिली. त्यानंतर ह्या भामट्यांनी दागिनेही चमकवून देतो असे सांगून दागिन्यांची मागणी केली.

त्यावर गृहस्वामिनीने आपल्या हातातील तीन तोळे वजन असलेले सोन्याचे दोन कंगन आणि अर्धा तोळे वजनाची सोन्याची अंगठी या भामट्यांना दिली. त्यांनी दागिने चमकविणे करिता गरम पाण्याची मागणी केली. त्यांना गरम पाणी देण्यात आले. या पाण्यात त्या दोघांनी आपल्याकडील भुकटी टाकली.

आणि दागिन्यांचा तो डबा झाकून ठेवण्यास सांगितले. पंधरा ते वीस मिनिटात दागिने चमकतील असेही ते म्हणाले. त्यावर गृहस्वामिनी दागिन्यांचा डबा घेऊन स्वयंपाकगृहात केली. तिच्या पाठोपाठ एक भामटाही स्वयंपाक गृहात केला. आणि दागिन्यांच्या डब्यात जराशी हळद टाकण्यास सांगितले.

त्यानुसार डबा गॅसच्या ओट्यावर ठेवून गृहस्वामिनी हळद घेण्याकरिता हळदीचा डबा शोधू लागली. ती संधी साधून या भामट्याने झटकन डब्यातील दागिने काढून घेतले. आणि आपल्या सोबत्याकडे माघारी आला.

ईकडे गृहस्वामिनीने हळद टाकून डब्यात हात घालताच त्यात दागिने नसल्याचे समजले. त्यामुळे तिने वरच्या मजल्यावर पहूडलेल्या आपल्या पुतण्याला हाक मारली. तो वरून खाली येत असतानाच या भामट्यांनी तेथून पळ काढला.

विशेष म्हणजे तरडेजा यांचे घरी येण्यापूर्वी ह्या दोन भामट्यांनी त्यांच्या शेजारच्या घरीही दागिने चमकवणे बाबत विचारणा केल्याचे आणि त्या घरच्या लोकांनी या दोघांना धुडकावून लावल्याचे समजते. दुसरे म्हणजे तरडेजा यांचे घराचे दोन्ही बाजूस जाणाऱ्या मार्गावर बऱ्याच ठिकाणी सीसीटी कॅमेरे लावलेले असल्याने या भामट्यांची चित्रे त्यात कैद झाले असल्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस तपासात मोठे सहकार्य मिळू शकते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: