पातुर – निशांत गवई
पातुर तालुक्यातील पातुर ते मालेगाव रोडवरील भारत पेट्रोलियम पंपाजवळ 29 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी सुमारे 6:30 वाजता भीषण अपघात घडला. या अपघातात एक मोटरसायकल आणि एक ॲक्सिस दुचाकी टक्कर झाली. यामध्ये दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत.
अपघाताच्या ठिकाणी मोटरसायकलवर अजय प्रल्हाद दामोदर (गाडी क्रमांक एमएच 39 ए जे 80 85) आणि ॲक्सिस दुचाकीवर गणेश कैलास चोपडे (गाडी क्रमांक एमएच 37 ए एफ 9452) होते. दोन्ही वाहनांमध्ये झालेल्या टक्करमुळे दोन्ही जण गंभीर जखमी झाले. त्यांना त्वरित उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पातुर पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना मदत पुरवली. पोलिसांनी दोन्ही वाहनांचे तपासणी करून आणि घटना स्थळीची पाहणी करून अपघाताची सविस्तर माहिती घेतली आहे. सध्या या प्रकरणी पातुर पोलीस अधिक तपास करत आहेत.
मोटरसायकल आणि ॲक्सिस दुचाकीच्या अपघाताने पातुर परिसरात खळबळ उडाली असून, संबंधितांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अपघाताचे नेमके कारण समजून घेण्यासाठी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.