आय पी एस अधिकारी आशुतोष डुंबरे, यांची ठाण्याचे पोलीस आयुक्तपदी वर्णी…
ठाणे – प्रफुल्ल शेवाळे
राज्यातील 2 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश सोमवारी गृह विभागाने जारी केले आहेत.आयपीएस अधिकारी आशुतोष डुंबरे यांची ठाणे शहर पोलिस आयुक्त पदी वर्णी लागली आहे.आशुतोष डुंबरे राज्याच्या गुप्त वार्ता विभागात कार्यरत आहेत. डुंबरे यांच्या सोबत सध्याचे ठाण्याचे पोलिस आयुक्त जयजित सिंह यांची राज्याच्या महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य मुंबई पदी बदली करण्यात आली आहे.
आशुतोष डुंबरे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूर या गावचे रहिवासी आहेत.. आशुतोष डुंबरे यांनी ठाण्यात यापूर्वी अतिरिक्त पोलीसआयुक्त म्हणून जबाबदारी पार पाडली आहे..
आशुतोष डुंबरे 1994 बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी असून त्यांची ठाणे शहर पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांचा दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला असून त्यांना बढती मिळाली आहे. त्यामुळे ठाण्यालाही नवीन आयुक्त मिळाला आहे.
डुंबरे हे राज्यात ‘सुपर कॉप’ म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी अनेक हायप्रोफाईल प्रकरण हाताळले आहेत. त्याचबरोबर त्यांनी ठाण्यातील बिल्डर सुरज परमार आत्महत्या प्रकरणही हाताळलं होतं..