सांगली – ज्योती मोरे
सांगली जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांचा तपास करण्याचा आदेश पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांनी दिल्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी पथक तयार करून तपास सुरू केला असता इस्लामपूर भागात पेट्रोलिंग करत असताना खास बातमीदारांने इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जबरी चोरी मधील रेकॉर्ड वरील गुन्हेगार किरण दत्तात्रय चव्हाण रा.चिखली कारखान्याजवळ चिखली,तालुका शिराळा आणि गोरखनाथ रघुनाथ कांबळे वय वर्षे 22 राहणार बावधन, तालुका वाई, जिल्हा सातारा हे दोघे मोटरसायकलवरून इस्लामपूर पेठ नाक्यावर पुलाखाली चोरीचा माल विक्री करता येणार असल्याची माहिती दिल्यानुसार सदर ठिकाणी छापा टाकून दोघांनाही अटक करण्यात आले.
त्यांची अंगझडती घेतली असता,किरण चव्हाण याच्या खिशात सोन्याचे दागिने मिळून आले तर गोरखनाथ कांबळे याच्या कमरेला चाकू मिळून आला.सदर दागिन्यांबाबत विचारपूस केली असता, सदरचे दागिने हे पाच नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता इस्लामपूर बस स्टैंड वर कामेरीला जाण्याकरता बसची वाट बघत बसलेल्या वयोवृद्ध महिलेस मोटरसायकल वरून गावी सोडण्याच्या बाहण्याने गाडीवर बसून काळमवाडी मधील देसाई मळ्याजवळ आडबाजूला जाऊन चाकूचा धाक दाखव कानातील सोन्याची कर्णफुले, गळ्यातील बोरमाळ आणि छोट्या मन्याची माळ असा एकूण 96 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल घेऊन पळ काढल्याचे सांगण्यात आले.
सदर गुन्ह्याबाबत इस्लामपूर पोलीस ठाण्यात चौकशी करून आरोपींना आणि मुद्देमाल इस्लामपूर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलाय. सदरचे गुन्हेगार हे सराईत गुन्हेगार असून, त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात अनेक गुन्हे केले आहेत. पुढील तपास इस्लामपूर पोलीस स्टेशन करत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्ह्यांविषयी शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक रोहिदास पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण पाटील,पोलीस नाईक प्रकाश पाटील, पोलीस शिपाई सुरज थोरात, विनायक सुतार, अभिजीत ठाणेकर, सुनील जाधव,पोलीस नाईक कॅप्टन गोंडवाडे आदींनी केली आहे.