Sunday, November 17, 2024
Homeराज्यनांदेड मध्ये अल्पवयीन बालकाकडुन चोरीच्या दोन मोटरसायकल जप्त: एक मोटारसायकल बेवारस आढळली…

नांदेड मध्ये अल्पवयीन बालकाकडुन चोरीच्या दोन मोटरसायकल जप्त: एक मोटारसायकल बेवारस आढळली…

नांदेड – महेंद्र गायकवाड

नांदेड शहरातील वजीराबाद गुन्हे शोध पथकाने एका अल्पवयीन बालकाकडून दोन मोटारसायकल जप्त केल्या असून एक मोटारसायकल बेवारस आढळून आल्याने ती मोटारसायकल ग्रामीण पोलिस ठाण्याच्या गुन्हयातील असल्याने ती मोटार सायकल ग्रामीण पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिली आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, किरतीका एम.एस. सहाय्यक पोलीस अधिक्षक, उप विभाग नांदेड शहर यांनी जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे स्वाधीन अधिकारी व गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सुचना देऊन जास्तीत जास्त मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणावेत अशा सुचना दिल्या आहेत.

त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी वजीराबाद गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी आर.डी. वटाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना मोटरसायकल चोरीचे गुन्हयांचे घटनास्थळी भेट देऊन तेथील सिसिटीव्ही कॅमेरे चेक करुन आरोपीतांचा शोध घेण्याबाबत आदेशीत केले.

त्याप्रमाणे दिनांक 16 मे रोजी सपोनि आर.डी. वटाणे, पोहेकॉ शरद सोनटक्के, पोहेकॉ माधव नागरगोजे, पोकॉ बालाजी कदम, पोकॉ शेख ईग्रान, पोकॉ रमेश सुर्यवंशी, पोकॉ भाऊसाहेब राठोड, पोकॉ अंकुश पवार, पोकॉ मेघराज पुरी हे मोटरसायकल चोरट्यांचा शोध घेत असतांना छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एक अल्पवयीन बालक बिनाक्रमांकाचे मोटरसायकल घेऊन जात असतांना आढळुन आल्याने त्यास थांबवून चौकशी केली असता सदरची मोटरसायकल चोरीची असल्याचे स्पष्ट झाले.

त्यावरुन पोलिसांनी त्यास अधिक विश्वासात घेऊन विचारणा केली असता त्यांनी ईतर एक चोरीची मोटरसायकल काढुन दिली. सदर मोटरसायकल चोरीचे अनुषंगाने पोलीस ठाणे वजीराबाद, नादेड येथे गु.र.न. 109/2024 व 210/2024 कलम 379 भारतीय दंड विधान प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

मोटरसायकल चोरट्यांचा शोध घेत असतांना तीरंगा चौकातील शौच्छालयाचे बाजुस एक युनीकॉन कंपनीचे मोटरसायकल बेवारस स्थितीमध्ये असल्याची माहीती मिळाल्यावरुन सदर ठीकाणी पाहणी केली असता बेवारस अवस्थेत युनीकॉन मोटरसायकल मिळुन आली. त्याबाबत खात्री करता ती पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण गु.र.न. 316/2024 कलम 379 भारतीय दंड विधान या गुन्हयातील असल्याची खात्री झाल्याने सदर मोटरसायकल नांदेड ग्रामीण यांचे ताब्यात देण्यात आली आहे.

Mahendra Gaikwad
Mahendra Gaikwadhttp://mahavoicenews.com
Mahendra Gaikwad महेंद्र गायकवाड, पाटबंधारे नगर तरोडा (बु) नांदेड, मी गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात असून आजपर्यंत राजकीय, सामाजिक, क्राईम, अनेक विषयावर वृत्त लेखण केले आहे. अनेक पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: