सांगली – ज्योती मोरे.
पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दिलेल्या आदेशानुसार, मालमत्तेच्या गुन्ह्याची माहिती काढून अशा आरोपींवर कारवाई करण्यासाठी पेट्रोल लिंक करत असताना खास बातमीदाराने शाहिद हुसेन आसंगी वय वर्षे 22 राहणार- संभाजी कॉलनी, टिंबर एरिया, सांगली. आणि अनिल शिवाजी खिलारे वय 33 राहणार- बजरंग नगर, कुपवाड,ता.मिरज.
हे दोघे चोरी केलेल्या मोटरसायकली विक्री करणार असून सदर मोटरसायकली शाहिद असंगी यांच्या घरासमोर संभाजीनगर येथे असल्याची माहिती दिल्यानुसार सदर ठिकाणी छापा टाकून या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता,सदर गाड्यांपैकी दोन गाड्या या एमआयडीसी कुपवाड इथून तर तिसरी गोकुळ शिरगाव मधून चोरल्याची कबुली दिली.
गुन्ह्याची खात्री झाल्यानंतर त्यांच्या कब्जातील दीड लाख रुपये किमतीच्य तीन हिरो होंडा कंपनीची गाड्या जप्त करण्यात आल्या. मोटरसायकली जप्त करून आरोपी सह मुदेमाल एम आय डी सी कुपवाड पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील,पोलीस हेड कॉन्स्टेबल दरिबा बंडगर, नागेश खरात, मच्छिंद्र बर्डे, बिरोबा नरळे, सागर लवटे,उदय माळी, पोलीस नाईक अनिल कोळेकर, सागर टिंगरे, पोलीस शिपाई विक्रम खोत, सोमनाथ पतंगे आदींनी केली आहे.