आलेगाव येथे चान्नी पोलिसांची कारवाई…
पातूर – निशांत गवई
पैशाच्या हारजीतवर जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून या कारवाईत नगदी २४ हजार ७६० रुपये, ७७ हजार रुपये किमतीचे ०६ मोबाईल, १ लाख ३५ हजार रुपये किंमतीच्या दोन दुचाकी असा एकूण २ लाख ३६ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईत सहा जुगारी पोलिसांच्या हाती लागले,ही कारवाई चान्नी पोलिसांकडून आलेगाव येथे रविवारी सापडा रचून करण्यात आली आहे.
१.शेख मोबीन शेख मुसा, २. यावर खान सनाउल्ला खान, ३.जफर खान सनाउल्ला खान, ४) अब्दुल अजहर जहिर,५) सैजाद खान इमदात खान, ६) मोहम्मद वसीम मोहम्मद फारुक सर्व रा.आलेगाव अशी जुगार खेळणाऱ्यांची नावे आहेत.
त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळून एकूण २ लाख ३६ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.त्यांच्या विरुद्ध जुगार कायद्यानुसार चान्नी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.