Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीआगीत दोन घरे जळून खाक - गॅस सिलेंडरचा झाला स्पोट...आगीचे कारण अद्याप...

आगीत दोन घरे जळून खाक – गॅस सिलेंडरचा झाला स्पोट…आगीचे कारण अद्याप अस्पष्ट

  • थोडक्यात जिविती हानी टळली.,
  • घरातील सर्व साहित्य जळून खाक.,
  • लोहारी सावंगा येथील घटना.,
  • सोमवारी दुपारी 1 वाजता ची घटना.
  • उत्तम भीमराव घाटनासे व ओमकार शामराव होके यांची घरे जळून खाक

नरखेड – अतुल दंढारे

नरखेड तालुक्यातील लोहारीसावंगा येथे सोमवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास घराला अचानक आग लागली असून यात दोन घरे जळून खाक झाली. सोमवारी दुपारी 1 च्या सुमारास उत्तम भीमराव घाटनासे यांच्या घराला अचानक आग लागली घरी असलेल्या गंगा घाटनासे यांना आग लागल्याचे दिसले असता त्यांनी आरडा ओरड करत आजू बाजूच्या नागरिकांना आवाज दिला. गावकऱ्यांनी पाण्याच्या सहायाने आग विझविण्याचा प्रयत्न केले. घर कुडाचे असल्यामुळे आगीने प्रचंड रूप धारण केले.

यात घरात असलेल्या सिलेंडरचा स्पोट झाला असून बाजूला असलेले ओमकार शामराव होके यांचे सुध्दा घर जळून खाक झाले. गावातील सरपंच, उपसरपंच सदस्य व गावकऱ्यांनी आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न केले असून मोवाड येथील अग्निशमनला बोलावण्यात आले. अग्निशमन व गावकऱ्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने यात कसलीही जीवितहानी किंवा कोणी जखमी झाले नाही.

या घटनेची माहिती पोलिस स्टेशन व पटवारी यांना देण्यात आली असून पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून अहवाल पाठवन्यात आला आहे. आग कशामुळे लागली अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास ठाणेदार मनोज चौधरी यांच्या मार्गद्शनाखाली बीट जामदार प्रज्योग तायडे करीत आहे.

दोन्ही घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सरपंच विपिन चापले यांनी या घटनेची माहिती जिल्हा परिषद सभापती प्रवीण जोध व तहसीलदार यांना दिली असून सरपंच विपिन चापले, उपसरपंच गुणवंत राऊत व ग्राम पंचायत सदस्य यांनी गावकऱ्यांच्या मदतीने या दोन्ही परिवाराला थोडी फार मदत केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: