न्यूज डेस्क – सुहेलदेव एक्स्प्रेसच्या दोन डब्यातील गेल्याने प्रवासी नाराज झाले आणि त्यांनी आपला सर्व राग टीटीईवर काढला. खरं तर, ट्रेन दिल्लीच्या आनंद विहारहून यूपीच्या गाझीपूरसाठी रवाना झाली, त्यानंतर काही वेळातच पावर फेल झाल्याने ट्रेनच्या दोन डब्यातील लाईट बंद झाली. यानंतर संतप्त प्रवाशांनी टीटीईला टॉयलेटमध्ये कोंडले.
दिल्लीच्या आनंद विहार टर्मिनलवरून उत्तर प्रदेशातील गाझीपूरला जाणाऱ्या सुहेलदेव सुपरफास्ट एक्स्प्रेस ट्रेनच्या दोन डब्यांमधील वीजपुरवठा अचानक बंद झाल्याने प्रवाशांनी शुक्रवारी तिकीट कलेक्टरला (टीटीई) टॉयलेटमध्ये कोंडले, अशी माहिती वृत्तसंस्था पीटीआयने दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, आनंद विहार टर्मिनलवरून ट्रेन (22420) सुहेलदेव सुपरफास्ट एक्स्प्रेस सुटल्यानंतर काही मिनिटांतच B1 आणि B2 डब्यांचे लाईट गेली त्यामुळे डब्यातील एसीही बंद झाले. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी ट्रेनमधील वीज खंडित झाल्याने गोंधळ घातला आणि टीटीईला पकडून शौचालयात कोंडले. दरम्यान, रेल्वे पोलीस दलाने (RPF) अधिकाऱ्यांसह प्रवाशांची समस्या लवकरच सोडवण्याचे आश्वासन दिले.
रात्री 1 च्या सुमारास तुंडला स्थानकावर ट्रेन दोन तासांहून अधिक काळ थांबली होती, जिथे अभियंत्यांच्या एका पथकाने वीज खंडित होण्याच्या कारणाची चौकशी सुरू केली आणि B1 कोचमधील समस्या दूर केली. यानंतर बी 2 कोचमध्येही वीजपुरवठा पूर्ववत झाला आणि ट्रेन आपल्या गंतव्यस्थानाकडे रवाना झाली.