Sunday, December 22, 2024
Homeराज्यदोन दाडी वाल्याने देश आणी राज्य बरबाद केला - नितेश कराडे...

दोन दाडी वाल्याने देश आणी राज्य बरबाद केला – नितेश कराडे…

चंद्रपूर – नरेंद्र सोनारकर

दोन दाडी वाल्याने देश आणी राज्य बरबाद केला.महाराष्ट्राला लुटून राज्यातील मोठे उद्योग गुजरातला पळविले,हजारो बेरोजगारांच्या तोंडचे पाणी पळवले.अडाणी आंबनीचे हे केंद्र आणी राज्यातील सरकार उपडून फेकल्या शिवाय देशात स्वतंत्र,समता,बंधुता नांदणार नाही.

2014 पर्यंत हिंन्दु खतऱ्यात नव्हता पण भाजप ची सरकार स्थापन झाल्यापासून हिंदू कसा काय खतऱ्यात आला?हिंदू खतऱ्यात नाही,यांची खुर्ची खतर्यात असल्याचे परखड मत कराडे मास्तरांनी मांडले.

पुढे शिंदे सेनेवर मिश्किल टिका करत ते म्हणाले “धनुष्यबान पळविले,शिवसेना नाव पळविले,बापाचे नाव पळवता आले नाही म्हणून बरे झाले,नाहीतर दोन बापाच्या नावाची गोची झाली असती…अशा शब्दात त्यांनी महायुती सरकारचा खरपूस समाचार घेतला…

आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी कराडे मास्तरांची तोप दणानली..बल्लारपूरात आज दुपारी 3 वाजता स्थानिक वस्ती विभागातील गांधी पुतळा परिसरात मुख्य वक्ता नितेश कराडे सर आणि तेलंगणा सरकारच्या पंचायत राज, ग्रामविकास, ग्रामीण पाणी पुरवठा व महिला बालकल्याण मंत्री दानसारी अनुसया (सीताक्का) यांनी मोठ्या जाहीर सभेला संबोधित करून महाविकास आघाडीचे उमेदवार संतोषसिंह रावत यांच्यासाठी मते मागितली.

यावेळी मंचावर प्रमुख वक्ते नितेश कराडे सर व तेलंगणा सरकारच्या पंचायत राज, ग्रामविकास, ग्रामीण पाणी पुरवठा व महिला बालकल्याण मंत्री दानसारी अनुसया (सीताक्का), पोन्नम प्रभाकर मागासवर्गीय मंत्री, सुरेखा कोंडा वन मंत्री ,महाविकास आघाडीचे उमेदवार संतोष सिंह रावत, माजी आमदार जैनुद्दीन झवेरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, बेबी ताई ऊईके,शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे, माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, शहराध्यक्ष अब्दुल करीम शेख, माजी गटनेते देवेंद्र आर्य सह आदी नेते उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: