Friday, January 10, 2025
Homeगुन्हेगारीरामटेक | अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा जागेवरच मृत्यु...

रामटेक | अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा जागेवरच मृत्यु…

  • तुमसर मार्गावरील भिषण अपघात
  • अज्ञात वाहन धडक देवुन फरार

रामटेक – राजु कापसे

रामटेक येथे साक्षगंध कार्यक्रम आटोपुन परतीच्या मार्गावर असलेल्या मौदा तालुक्यातील रेवराळ येथील दोन दुचाकीस्वारांना विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना आज दि. १६ नोव्हेंबर ला दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.चंद्रशेखर मुरलीधरजी कोठे व दादाराम दिलीराम हारोडे असे मृतकांची नावे असुन ते रेवराळ येथील रहीवाशी आहे.

आज दि. १६ नोव्हेंबर रोजी रेवराळ येथील एका तरुणाचा रामटेक येथील देशमुख सेलिब्रेशन हॉल येथे साक्षगंधाचा कार्यक्रम होता. तेव्हा तरुणाचे गावातील नातेवाईक व नागरीक कार्यक्रमाकरिता रामटेक येथे आले होते. याच कार्यक्रमाला मृतक चंद्रशेखर व दादाराम हे सुद्धा आले होते.

कार्यक्रम झालेवर दुपारी ३ वाजताच्या सुमारास चंद्रशेखर मुरलीधरजी कोठे व दादाराम दिलीराम हारोडे हे चंद्रशेखर याचे बजाज डिसकवर मो.सा.क्र. MH 40 U 3972 नी रामटेक वरुन गावी रेवराल येथे जाण्याकरिता निघाले. त्यांची मोटार सायकल शहराबाहेरील सूर्या हॉटेल जवळ येताच त्यांच्या दुचाकीला एका अज्ञात वाहनाने समोरुन जबर धडक दिली.

धडक एवढी जोरदार होती की दोघाही मृतकांच्या डोक्याला गंभीर दुखापत होवुन मृतकांपैकी एकाचा पाय तुटुन दुसरीकडे पडला होता. दोघांचाही घटनास्थळावरच मृत्यु झाला. रामटेक पोलिसांनी अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास सुरु आहे.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: