सांगली – ज्योती मोरे
सांगली शहर पोलिसांनी बस स्थानक परिसरात कारवाई करत पुणे जिल्ह्यातील दोघांना एका विनापरवाना पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसासह ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एकूण 60 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सांगली शहर पोलीस ठाण्याकडून पेट्रोलिंग करत असताना पोलीस कॉन्स्टेबल अंकुश कदम यांना खास बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार सांगली बस स्टँड परिसरात छापा टाकून बेकायदा विनापरवाना पिस्तूल तीन जिवंत कडतुसासह अविनाश बाबासाहेब भालेराव. वय वर्षे -24,राहणार- जुनी सांगवी गावठाण महादेव मंदिर,ता.-हवेली, जिल्हा- पुणे. आणि ऋषिकेश किसन पवार. वय वर्षे-23,राहणार -बेनकर वस्ती धायरी, तालुका- हवेली,जिल्हा-पुणे.या दोघांना अटक करण्यात आली आहे.
त्यांच्याकडून एक विनापरवाना पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे, दोन मोबाईल असा एकूण साठ हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.त्यांच्यावर भारतीय हत्यार अधिनियम कलम 325 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाअसून,सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली,अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजीत देशमुख साहेब,
पोलीस निरीक्षक विजय कार्वेकर,पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार, पोलीस हेडकॉन्स्टेबल विनायक शिंदे, संदीप पाटील, सचिन शिंदे, पोलीस नाईक झाकीर हुसेन काझी, डॅनियल घाडगे,गणेश कांबळे, अभिजीत माळकर, अमित मोरे, अंकुश कदम, रोहन गस्ते, होमगार्ड भीमसागर गायकवाड आदींनी केले.