Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीआकोटात क्रिकेट सट्टा खेळणाऱ्या दोघांना अटक, एक फरार...

आकोटात क्रिकेट सट्टा खेळणाऱ्या दोघांना अटक, एक फरार…

अकोट – संजय आठवले

आकोट शहरातील तहापुरा या भागात सार्वजनिक मोकळ्या जागेत काहीजण क्रिकेटवर सट्टा खेळत असल्याची गुप्त माहिती आकोट पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळी छापा घातला असता, तेथे क्रिकेटवर सत्ता खेळणाऱ्या तिघांना रंगेहात अटक करण्यात आली. त्यातील मनोज जोशी राहणार तेल्हारा हा फरार झाला. तर अब्दुल समीर अब्दुल सत्तार वय वर्ष २२ राहणार तहापुरा आकोट, दिनेश रघुवंशी वय वर्षे ४६ राहणार गवळीपुरा आकोट या दोघांना ताब्यात घेण्यात आले.

या आरोपींकडून क्रिकेट सट्टयाचे आकडे लिहिलेल्या दोन कागदी चिठ्ठ्या, दोन मोबाईल किंमत २४००० रुपये, रोख रक्कम ७२० रुपये असा २४हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई आकोट उपविभागीय पोलीस अधिकारी रितू खोखर, ठाणेदार प्रकाश अहिरे, पोउनि राजेश जवरे, पोहेकॉं सुलतान पठाण, अमोल बहादुरकर, विजय सोळंके, कपिल राठोड, विशाल हिवरे यांनी केली. आरोपी विरोधात सुलतान पठाण यांनी तक्रार दिली. त्यावरुन महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ व भादवि कलम १०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: