Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीक्रिकेट सट्टा खेळणाऱ्या दोघांना अटक, अकोट पोलिसांची कारवाई ६५ हजारांचा ऐवज जप्त...

क्रिकेट सट्टा खेळणाऱ्या दोघांना अटक, अकोट पोलिसांची कारवाई ६५ हजारांचा ऐवज जप्त…

आकोट – संजय आठवले

आकोट शहरातील मोठे बारगण परिसरात क्रिकेटवर सत्ता खेळला जात असल्याची गुप्त माहिती आकोट पोलिसांना मिळाली. या माहितीवरून आकोट पोलीस पथकाने मोठे बारगण येथ छापा घातला. तेव्हा त्या ठिकाणी आयसीसी टी २० विश्वचषक २०२२ मधील ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान दरम्यान खेळल्या जात असलेल्या क्रिकेट सामन्यावर सट्टा सुरू असल्याचे आढळून आले.

हा सट्टा खेळणाऱ्या आरोपी नामे १) अमोल सुधाकर शिंगणारे, धंदा मजुरी, वय ३७ वर्ष, रा. मोठे बारगण आकोट २ ) सुरज कुवंरपाल जयस्वाल, वय ३१ वर्ष, रा. गोलबाजार आकोट यांना अटक करण्यात आली. त्यांचे ताब्यातून नगदी ८४०/- रू व क्रिकेट सटटयाचे आकडे लिहीलेल्या दोन कागदी चिठ्ठ्या, एक मोबाईल कि अं २५,०००/- रु., एक एल.जी कंपनीचा लॅप टॉप कि अं ४०,०००/- असा एकुण ६५, ८४०/- चा माल मिळून आला.

सदर मुद्देमाल ताब्यात घेतला. सदर गुन्हयातील वर नमुद आरोपी हयाचे विरुद्ध पोहेकॉं सुलतान पठाण यांचे तक्रारीवरून कलम १२ अ महाराष्ट्र जुगार अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करून तपासात घेतला. सदर कार्यवाही उपविभागिय पोलिस अधिकारी रितु खोकर मॅडम, पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांचे मार्गदर्शना खाली पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरे, पो. हवा. सुलतान पठाण, नापोकों विजय सोळंके, अमोल बहादुरकर, पोकों कपिल राठोड, विशाल हिवरे यांनी केली

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: