सांगली – ज्योती मोरे
आष्ट्यातील सनशाइन बार मध्ये दारू मागितल्याच्या कारणावरून झालेल्या वादावादीतून वैभव घस्ते याचा काही
इसमानी चाकून भोकसून खून केल्याची घटना २० नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठच्या दरम्यान घडली होती.
यातील आरोपी फरारी असल्याने त्यांचा तपास करून अटक करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दिल्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन आणि स्टाफ चे एक पथक तयार करून तपास सुरू केला होता.
तपास सुरू असताना खास बातमीदारांने आष्ट्यातील खून प्रकरणातील दोन आरोपी हे मोटरसायकलवरून आष्टा ते सांगली रोडने जात असल्याची माहिती दिल्यानुसार, लक्ष्मी फाट्यावर सापळा रचून दोघा संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी आपली नावे अंकित नरेश राठोड वय वर्षे 21 राहणार गांधीनगर, आष्टा, तालुका वाळवा मुळगाव रामपूर मन्सूरपूर तालुका मल्लावा, जिल्हा हरडोई, उत्तर प्रदेश आणि प्रतीक भरत जगताप वय वर्षे वीस राहणार योगेश डेअरी जवळ, शिराळकर कॉलनी, आष्टा. मुळगाव मदनसुरी, तालुका निलंगा, जिल्हा लातूर अशी सांगितली. वैभव घस्तेच्या खुनाच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी घस्ते याच्याकडे पिण्यासाठी दारू मागितल्यानंतर त्यांना ती देण्यास नकार दिल्याने त्याचा खून केल्याची कबुली दिली आहे.
सदर आरोपींना पुढील तपास कामी आष्टा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे,सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन, पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण पाटील, कुबेर खोत ,पोलीस शिपाई सुरज थोरात,अभिजीत ठाणेकर, रोहन घस्ते, पोलीस नाईक कॅप्टन गुंडवाडे आदींनी केली.