Monday, December 23, 2024
Homeराज्यपंजाब राज्यातील दोन फरार आरोपी नांदेड पोलिसांच्या ताब्यात...

पंजाब राज्यातील दोन फरार आरोपी नांदेड पोलिसांच्या ताब्यात…

नांदेड – महेंद्र गायकवाड

पंजाब राज्यातील दोन आरोपी गुन्हा करून नांदेड येथे वास्तव्यास असल्याची गोपनीय माहिती नांदेड पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी दोन आरोपीना ताब्यात घेऊन पंजाब पोलिसांच्या स्वाधीन केले.

पंजाब येथील जिल्हा कपुरथला पोलीस ठाण्यात अंतर्गत असलेल्या सुलतानपुर लोधी येथील गुरनं 235/2023 कलम 307, 324, 323, 379(ब), 447, 448, 511, 436, 427, 148, 149 भादंवि सह कलम 25, 27 भाहका मधील दोन फरार आरोपी पंजाब राज्यात गुन्हा करुन नांदेड येथे पळुन आल्याची गोपनिय माहिती मिळाली होती.

सदरील आरोपीतांचा शोध घेण्यासाठी पंजाब राज्य पोलीसांचे एक पथक नांदेड येथे दाखल झाले होते. त्यावरुन पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी खंडणी विरोधी पथकास पंजाब पोलीसांना मदत करुन वरील फरार आरोपीतांचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते.

सदर गुन्हयातील दोन्ही फरार आरोपीतांची गोपनिय माहिती घेऊन शोध घेतला असता नांदेड शहर परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन त्यांना ताब्यात घेऊन पंजाब पोलीसांच्या स्वाधीन केले. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक, श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाने पार पाडली.

Mahendra Gaikwad
Mahendra Gaikwadhttp://mahavoicenews.com
Mahendra Gaikwad महेंद्र गायकवाड, पाटबंधारे नगर तरोडा (बु) नांदेड, मी गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात असून आजपर्यंत राजकीय, सामाजिक, क्राईम, अनेक विषयावर वृत्त लेखण केले आहे. अनेक पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: