टीव्ही मेकॅनिक शाहिद अलीच्या मुलीने अशी कमाल की सर्व देशात तीच कौतुक होत आहे. खरच जिद्द असेल तर काय कमाल होऊ शकते हे जसोवरमध्ये राहणाऱ्या सानिया मिर्झा हिने करून दाखविले, तिने NDA परीक्षेत 149 वा रँक मिळवून फ्लाइंग विंगमध्ये दुसरे स्थान मिळवले. सानिया देशातील पहिली मुस्लिम महिला फायटर पायलट बनली. तीने एनडीएमध्ये महिलांच्या 19 जागांपैकी सानिया मिर्झाला दुसरे स्थान मिळाले आहे.
सानिया ही उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्हातील देहत कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जसोवर या छोट्याशा गावची रहिवासी आहे. तिने प्राथमिक ते दहावीपर्यंतचे शिक्षण गावातीलच पंडित चिंतामणी दुबे इंटर कॉलेज, इंटर कॉलेजमधून पूर्ण केले. यानंतर सानियाने शहरातील गुरु नानक गर्ल्स इंटर कॉलेजमधून बारावी पूर्ण केली. ती जिल्ह्याच्या यूपी बोर्डात जिल्हा टॉपर देखील होती.
10 एप्रिल 2022 रोजी एनडीएची परीक्षा दिली. नोव्हेंबरमध्ये जाहीर झालेल्या यादीतही तिचे नाव होते. फ्लाइंग विंगमध्ये निवड झालेल्या दोन महिलांपैकी ती एक आहे. 27 डिसेंबरला सानियाला खडगवासला पुणे येथे जाऊन एनडीएमध्ये सामील व्हायचे आहे.सानिया मिर्झाचा प्रेरणास्रोत अवनी चतुर्वेदी ही पहिली महिला पायलट आहे.