Monday, December 23, 2024
HomeMarathi News TodayTutari | आमदार अमोल मिटकरींनी तुतारीवरून आव्हाडांना डिवचले...

Tutari | आमदार अमोल मिटकरींनी तुतारीवरून आव्हाडांना डिवचले…

Tutari : राष्ट्रवादी शरद पवारांच्या गटाला तुतारी चिन्ह भेटल्यापासून विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी X वर या गटाला टार्गेट करीत असल्याचे दिसत आहे. तर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांना डिवचत तीन चार पोस्ट अश्या लिहल्या की आमदार जितेंद्र आव्हाडांचा पारा वाढेल मात्र आव्हाड यांची कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.

आज रायगडावर चिन्ह भेटल्याचा सोहळा मोठ्या थाटात साजरा झाला झाला या सोहळ्याला शरद पवार गटांच्या नेत्यांनी हजेरीही लावली. त्या सोहळ्याला उपस्थित असलेले आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तुतारी वाजविली आणि X वर पोस्ट करीत लिहले…आदरणीय पवार साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेत तुतारी या नवीन चिन्हासहित पुन्हा एकदा इतिहास लिहिण्यास सज्ज..! वाजवा तुतारी,गाडा गद्दारी….यावर अजित पवारांच्या गटात असलेले राष्ट्रवादी प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांचा एक व्हिडीओ शेयर करीत आव्हाडांना टोमणा मारलाय.

अमोल मिटकरी X वर पोस्ट करीत लिहले…रायगडावर एकटेच पोहोचलेत. बाकीचे कालवा बैठकीत दादांकडे पुण्यात रेंगाळलेत. आपण दिलेलं चॅलेंज या महोदयांनी स्वीकारलं. मात्र कार्यक्रमानंतर एकट्याने वाजवावी आणि एकट्यानेच आवाज तुतारीतुन काढावा हे चॅलेंज होतं. हे एकटे आले पण बाकी कुठे आहेत?

दुसऱ्या पोस्टमध्ये अमोल मिटकरी यांनी ग्रामीण भागातील उदाहरण देत लिहले…ही तुतारी आहे का पुंगी ? आमच्याकडे उन्हाळ्यात कुल्फी विकणारे असंच वाजवतात…मात्र या video मध्ये पुंगीचा केला असल्याचे दिसत आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: