तुर्कस्तान आणि सीरियातील प्राणघातक भूकंपांमुळे आतापर्यंत 4,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. आदल्या दिवशी तुर्कस्तानला 7.8, 7.6 आणि 6.0 तीव्रतेचे सलग तीन विनाशकारी भूकंपाचे धक्के बसलेत, यामधे अजूनही अनेक नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले असून बचावकार्य सुरू आहे.
भूकंपाच्या केंद्रांपैकी एक असलेल्या मालत्या येथील ढिगाऱ्यातून नुकतेच एका 3 वर्षाच्या बाळाला वाचवण्यात आले. तो गेल्या २२ तासांपासून बिल्डिंगच्या मलब्याखाली दबलेल्या होता, मुलाला जेव्हा जिवंत बाहेर काढलं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरील हास्य बघून बचाव कर्त्यांनाही हसू आवरले नाही.
सोमवारी झालेल्या भूकंपामुळे तुर्कस्तान आणि सीरियासह चार देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला. गेल्या दिवशी येथे तीन वेळा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.8 इतकी मोजली गेली. शेकडो लोक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले असून अनेक बेपत्ता आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. तुर्कीमध्ये सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुर्की आणि सीरियामध्ये किमान 4000 लोक मारले गेले आहेत आणि 15000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. 10 शहरांमधील 1,700 हून अधिक इमारतींचे नुकसान झाले, असे अहवालात देशाचे उपाध्यक्ष फियाट ओकटे यांचा हवाला देत म्हटले आहे. त्याच वेळी, सीरियामध्ये किमान 783 लोक मारले गेले आणि 639 जखमी झाले. इस्रायल आणि लेबनॉनमध्येही अनेक मृत्यूची भीती व्यक्त केली जात आहे.