Tunisha Sharma Suicide: टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माचा सहकलाकार शीझान खानला आत्महत्या केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे तुनिषाच्या आईच्या तक्रारीवरून खानविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईतील वालीव पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम ३०६ (आत्महत्येला प्रवृत्त करणे) अंतर्गत शीजान खानविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. त्याला उद्या सोमवारी (26 डिसेंबर) न्यायालयात हजर केले जाणार आहे.
वसई, पालघर येथे शनिवारी एका २० वर्षीय अभिनेत्रीने एका मालिकेच्या सेटवर आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. अली बाबा दास्तान-ए-काबुलमध्ये राजकुमारी मरियमची भूमिका करणारी शर्मा, भारत का वीर पुत्र – महाराणा प्रतापमधील तिच्या कामासाठी ओळखली जात होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुनिषा शर्मा वॉशरुममध्ये गेली होती आणि बराच वेळ परतली नाही. त्यानंतर दरवाजा तोडला असता ती आत लटकलेल्या अवस्थेत आढळून आली.
कोण आहे तुनिषा शर्मा
4 जानेवारी 2002 रोजी जन्मलेली तुनिषा शर्मा चंदीगडची रहिवासी होती. लहानपणापासूनच तिने टीव्हीमध्ये काम करायला सुरुवात केली. अली बाबा: दास्तान-ए-काबुलमध्ये कास्ट होण्यापूर्वी तिने महाराणा प्रताप या मालिकेतून आपल्या करिअरची सुरुवात केली. याशिवाय तिने चक्रवर्ती अशोक सम्राट, गब्बर पुंचवाला, इंटरनेट वाला लव, शेर-ए-पंजाब: महाराजा रणजीत सिंह आणि इश्क सुभान अल्लाह यांसारख्या मालिकांमध्येही काम केले.
बऱ्याच सीरियल, शोमध्ये काम केल्याने तिच्यासाठी बॉलिवूडची दारेही खुली झाली. दबंग 3, कहानी 2, बार बार देखो आणि फितूर यांसारख्या चित्रपटांमध्ये ती दिसली होती.
तुनिषाचे इंस्टाग्रामवर एक दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि ती सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर बरीच सक्रिय होती. मृत्यूच्या अवघ्या सहा तासांपूर्वी त्यांनी इन्स्टाग्रामवर स्वत:चा एक फोटो पोस्ट केला होता…