Monday, December 23, 2024
HomeMobileTruke ने 'बड्स एस २ लाइट' आणि 'नेकबँड योगा मिस्टिक' लॉन्च...

Truke ने ‘बड्स एस २ लाइट’ आणि ‘नेकबँड योगा मिस्टिक’ लॉन्च…

Truke या उच्च दर्जाची ऑडिओ उत्पादने निर्माण करणा-या भारतातील झपाट्याने विकसित होत असलेल्या ऑडिओ ब्रॅण्डने आज दोन आकर्षक उत्पादने – योगा मिस्टिक नेकबॅण्ड आणि बड्स एस२ लाइट लॉन्च केले आहेत. बड्स एस२ लाइट हा ट्रूकचा पहिला पूर्णत: मेड-इन-इंडिया उत्पादन आहे, तर योगा मिस्टिक हा ब्रॅण्डचा पहिला नेकबॅण्ड आहे, ज्यामध्ये डिजिटल बॅटरी इंडिकेटर आहे. अनुक्रमे १३९९ रूपये व १२९९ रूपये या अत्यंत परवडणा-या किंमतीमध्ये दोन्ही उत्पादने विक्रीसाठी फ्लिपकार्ट व अॅमेझॉनवर उपलब्ध असतील.

बड्स एस२ लाइट: या बड्समध्ये प्रिमिअम केस डिझाइनसह लक्षवेधक मॅट फिनिश स्लाइडिंग डिझाइन, तसेच १-स्‍टेप इन्स्टण्ट पेअरिंग आहे. तसेच या बड्समधील शक्तिशाली क्वॉड-माइक नॉइज कॅन्सलेशन हाय-क्वॉलिटी कॉलिंग अनुभव देतात. या बड्समध्ये ऑटो इन-इअर डिटेक्शनसह हाय-प्रीसिशन कॉन्टॅक्ट सेन्सर आहे. युजर्सना दुप्पट जलद व विश्वसनीय कनेक्शनसाठी ब्ल्यूटूथ ५.१ सह त्वरित कनेक्टीव्हीटी मिळू शकते.

केसच्या शक्तिशाली ३०० एमएएच चार्जिंग क्षमतेच्या माध्यमातून ग्राहक यूएसबी-सी फास्ट चार्जिंगसह जवळपास ४८ तासांपर्यंत प्लेटाइमचा आनंद घेऊ शकतात. इअरबड्स एका सिंगल चार्जमध्ये जवळपास १० तासांपर्यंत प्लेटाइम देतात. गेमिंगप्रेमींच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी बड्समध्ये डेडिकेटेड गेमिंग मोडसह ५५ एमएस अल्ट्रा लो लेटन्सी आहे. बड्स ब्लॅक, ब्ल्यू व व्हाइट या ३ आकर्षक रंगांच्या व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध आहेत.

योगा मिस्टिक: योगा मिस्टिक हा डिजिटल बॅटरी इंडिकेटर असलेला इंडस्ट्री-फर्स्ट ब्ल्यूटूथ नेकबॅण्ड आहे. या नेकबॅण्डमध्ये प्रिमिअम रिअल सिलिकॉन युनिबॉडी डिझाइन आहे, जी इतरांपेक्षा अधिक आकर्षक दिसते. तसेच युजर्स १३ मिमी टायटॅनियम ड्रायव्हर्ससह सर्वोत्तम ऑडिओ अनुभवाचा आनंद घेऊ शकतात. तसेच या नेकबॅण्डमध्ये स्मार्ट अॅप्लीकेशन सपोर्टच्या माध्यमातून २० ईक्यू मोड्स देखील आहेत.

युजर्स जलद व विश्वसनीय ब्ल्यूटूथ ५.२ सह त्वरित कनेक्टीव्हीटी व ड्युअल-पेअरिंगचा देखील आनंद घेऊ शकतात. या नेकबॅण्डमध्ये उच्च दर्जाच्या ऐकण्याच्या अनुभवासाठी एन्व्हायरोन्मेंटल नॉईज कॅन्सलेशन (ईएनसी) आहे. तसेच या नेकबॅण्डमध्ये अद्वितीय गेमिंग अनुभवासाठी जवळपास ४० एमएस अल्ट्रा लो लेटन्सीसह डेडिकेटेड गेमिंग मोड देखील आहे. हा नेकबॅण्ड जवळपास ५० तासांपर्यंत प्लेटाइम आणि १० मिनिटांच्या चार्जिंगमध्ये १० तासांपर्यंत प्लेटाइमचा आनंद देतो. याव्यतिरिक्त युजर्स एएसी कोडेकसह हाय-फिडेलिटी म्युझिकचा आनंद घेऊ शकतात.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: