Monday, December 23, 2024
HomeMobileट्रूकने बड्स प्रो एएनसी इअरबड्स लॉन्च...

ट्रूकने बड्स प्रो एएनसी इअरबड्स लॉन्च…

ट्रूक हा उच्च दर्जाची ऑडिओ उत्पादने निर्माण करणारा भारतातील झपाट्याने विकसित होत असलेला ऑडिओ ब्रॅण्ड त्यांचा बहुप्रतिक्षित बड्स प्रो एएनसी इअरबड्स लॉन्च करत आहे. हे इअरबड्स १६९९ रूपये या स्पेशल लॉन्च डे किंमतीमध्ये अॅमेझॉन व फ्लिपकार्टवर उपलब्ध असेल.

या इअरबड्समध्ये हायब्रिड-अॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन (एएनसी)सह जवळपास ३० डेसिबल नॉइज कॅन्सलेशन, तसेच क्वॉड-माइक ईएनसी आहे, जे सुस्पष्ट कॉल्ससाठी ९० टक्के पार्श्वभूमी आवाज दूर करते. ते उच्च-सिनेमॅटिक म्युझिक अनुभवासह १२.४ मिमी रिअल टायटॅनिअम स्पीकर ड्रायव्हर्स देखील देतात.

या इअरबड्समध्ये समर्पित गेमिंग मोडसह जवळपास ५० एमएस पर्यंत अल्ट्रा लो लेटन्सी देखील आहे. हे इअरबड्स इन्स्टण्ट पेअरिंग टेक्नोलॉजीच्या माध्यमातून जलद कनेक्शन आणि ब्ल्यूटूथ ५.२ सह उत्तम स्थिरता देखील देऊ शकतात.

तसेच हे इअरबड्स केसवरील डिजिटल बॅटरी इंडिकेटरसह जवळपास ४८ तासांपर्यंत हमीपूर्ण प्लेटाइम आणि एका चार्जमध्ये १० तासांपर्यंत प्लेटाइमची खात्री देतात. यूएसबी-सी फास्ट चार्ज नेहमी व्यस्त असणा-या युजर्ससाठी फक्त १० मिनिटांच्या चार्जिंगमध्ये २ तासांचे प्लेटाइम देते. तसेच या इअरबड्सना १ वर्षाच्या वॉरंटीचे समर्थन आहे आणि ग्राहकांना २०० हून अधिक सक्रिय सर्विस सेंटर्सचे प्रबळ नेटवर्क उपलब्ध होण्यासोबत प्रिमिअम विक्री-पश्चात्त अनुभवाचा आनंद घेता येईल.

ट्रूक इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पंकज उपाध्याय म्हणाले, “ट्रूकमध्ये आमचा नेहमीच आमच्या ग्राहकांना किफायतशीर दरांमध्ये अद्वितीय उत्पादने देण्याचा प्रयत्न राहिला आहे. आमचे नवीन उत्पादन आमच्या मिशनशी संलग्न आहे,

जेथे आम्ही हायब्रिड-अॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन (एएनसी), क्वॉड-माइक ईएनसी, दीर्घकाळापर्यंत टिकणारी बॅटरी व लो लेटन्सी अशी सर्वोत्तम वैशिष्ट्ये देत ग्राहकांच्या ३ प्रमुख समस्या – कॉल क्वॉलिटी, साऊंड क्वॉलिटी व गेमिंग अनुभवाचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. आम्हाला विश्वास आहे की, बड्स प्रो एएनसी कार्यक्षमता, तसेच आकर्षक डिझाइनमुळे लवकरच सर्वांमध्ये लोकप्रिय ठरतील.”

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: