Saturday, December 21, 2024
Homeराज्यबिलोलीत देशमुख पेट्रोल पंपच्या पार्किंगमधून ट्रकचे टायर चोरीला: शहर व परिसरात चोरीच्या...

बिलोलीत देशमुख पेट्रोल पंपच्या पार्किंगमधून ट्रकचे टायर चोरीला: शहर व परिसरात चोरीच्या प्रमाणात वाढ…

नांदेड – महेंद्र गायकवाड

बिलोली शहरालगत बोधनरोड कडे जाणाऱ्या मार्गांवर असलेल्या देशमुख पेट्रोलपंपच्या पार्किंग मधून चोरट्याने ट्रकच्या मागील बाजूचे दोन टायर डिस्क सहित चोरून नेले असल्याची तक्रार बिलोल पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. शहर व परिसरात चोरीचे प्रमाण वाढले असून पूर्वी झालेल्या चोरीतील आरोपी पोलिसांना अद्यापही सापडले नाहीत. गेल्या अनेक दिवसापासून पोलीस ठाण्याला पोलीस निरीक्षक नसल्याने या ठाण्याला सक्षम पोलीस निरीक्षक द्यावा अशी मागणी नागरिकांतून वारंवार होत आहे.

बिलोली शहरालगत देशमूख पेट्रोल पंप असून या पेट्रोल पंपच्या पार्किंग मध्ये दिनांक 9 जून ते 10 जुनच्या दरम्यान भोकर तालुक्यातील सोमठाणा येथील उत्तम बाबाराव गोरठकर यांनी आपल्या मालकीचे ट्रक क्र. एमएच-26/बीई -9077 हे थांबिवले असता चोरट्याने ट्रकच्या मागील डाव्या साइडचे दोन टायर डिस्कसहित चोरून नेले.

सदरील टायरची किंमत 76,000 रुपये असून याप्रकरणी ट्रकमालक गोरठकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बिलोली पोलीस ठाण्यात गुरन 91/2024 कलम 379 भादवी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बिलोली शहर व परिसरात चोरीच्या प्रमाणात वाढ झाली असून अनेक चोरीच्या गुन्ह्याचा तपास प्रलंबित आहे. बिलोली पोलीस ठाण्याला पोलीस निरीक्षकाचे पद असूनही गेल्या अनेक महिन्यापासून पोलीस निरीक्षकाची नियुक्ती का करण्यात येत नाही असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. बिलोली पोलीस ठाण्याला सक्षम पोलीस निरीक्षक द्यावा अशी मागणी नागरिकांतून वारंवार होत आहे..

Mahendra Gaikwad
Mahendra Gaikwadhttp://mahavoicenews.com
Mahendra Gaikwad महेंद्र गायकवाड, पाटबंधारे नगर तरोडा (बु) नांदेड, मी गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात असून आजपर्यंत राजकीय, सामाजिक, क्राईम, अनेक विषयावर वृत्त लेखण केले आहे. अनेक पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: