Wednesday, December 4, 2024
Homeराज्यखुमारी चौकात ट्रकने दुचाकीला चिरडले; वडिलांचा मृत्यू, मुलगा जखमी...

खुमारी चौकात ट्रकने दुचाकीला चिरडले; वडिलांचा मृत्यू, मुलगा जखमी…

रामटेक – राजु कापसे

जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील रामटेक पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खुमारी येथील चौक ओलांडत असलेल्या दुचाकीला नागपूरहून जबलपूरकडे येणाऱ्या ट्रकने उडवून त्याला काही अंतरापर्यंत ओढत नेल्याने दुचाकीवरील पिता-पुत्र गंभीर जखमी झाले.

त्यांना तातडीने नागपूरला उपचारासाठी पाठवण्यात आले. मात्र वाटेतच प्रकाश नारनवरे यांचा मृत्यू झाला. तर मौसम प्रकाश नारनवरे वय २१ हा जखमी झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास खुमारी चौकात घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, खैरी बिजेवाडा येथे राहणारे पिता-पुत्र यांची बोरडा गावात शेती आहे. शुक्रवारी शेतात भात कापणी व उचल आटोपून दोघेही त्यांच्या एमएच 40 सीडब्ल्यू 4043 क्रमांकाच्या दुचाकीने घरी परतत होते. ते खुमारी चौकात पोहोचले असता नागपूरहून जबलपूरच्या दिशेने भरधाव वेगात येणारा ट्रक क्र.RJ 11 GC 6852 ने मोसमच्या दुचाकीला धडक दिली.

ट्रक चालकाने धडक टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. दरम्यान, ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली आणि काही अंतरापर्यंत फरफटत नेले. त्यामुळे दुचाकीस्वार पिता-पुत्र जबर जखमी झाले. दोघांनाही उपचारासाठी नागपूरला पाठवण्यात आले. मात्र वाटेतच वडील प्रकाश यांच्या मृत्यूची बातमी समोर आली. रामटेक पोलीस अधिक  तपास करत आहेत.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: