Sunday, December 22, 2024
Homeराज्यनेपाळ मध्ये फडकला तिरंगा…ग्रामीण कष्टकरी शेतकऱ्याच्या मुलाने पटकावलं यश…

नेपाळ मध्ये फडकला तिरंगा…ग्रामीण कष्टकरी शेतकऱ्याच्या मुलाने पटकावलं यश…

शहापूर – प्रफुल्ल शेवाळे

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुकयातील शिवनेर या ग्रामीण भागातील प्रणय दिलीप फर्डे या युवकाने इंडो नेपाळ इंटरनॅशनल धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावून आपला तिरंगा नेपाळ देशा मध्ये फडकावला आहे..

प्रणय चे सदर यश म्हणजे.. तालुका, जिल्हा, राज्य आणि देश यासाठी एक मोलाची कामगिरी आहे असेच म्हणावं लागेल.. ग्रामीण कष्टकरी शेतकऱ्याच्या मुलाचं घवघवीत यश ते सुद्धा दुसऱ्या देशात जाऊन आपलं यश सिद्ध करणे म्हणजे जणू यशाच्या शिखरावर पोहचणे असेच आहे…

प्रणय चे वडील शेतकरी…रंग रंगोटी चे कामं करतात… प्रणय चे शिक्षण 12वी पास … घरची परिस्थिती सर्व सामान्य…
अशा परिस्थिती मधून.. प्रणय ने जिद्द, चिकाटी, मेहनत, खडतर प्रयत्न यांच्या जोरावर नेपाळ देशात आपला तिरंगा जणू दिमागात फडकावला आहे असेच म्हणावं लागेल.. प्रणय च्या यशाची चर्चा शिवनेर, तसेच शहापूर तालुक्यात होत असून कौतुकाचाही थाप लोकांमधून मिळत आहे..

Prafulla Shewale
Prafulla Shewalehttp://mahavoicenews.com
मी, प्रफुल्ल शांताराम शेवाळे, रा. टिटवाळा ता. कल्याण जि. ठाणे, पदवी - विद्युत अभियंता, विद्युत अभियांत्रिकी क्षेत्रात 20 वर्षे अनुभव. पत्रकारिता गेल्या 7 वर्षापासून करतो, मी महाव्हाईस न्यूज ला गेल्या पाच वर्षापासून परिसरातील बातम्या देण्यासाठी नेहमीच सहकार्य करतो...
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: