Wednesday, October 30, 2024
Homeराज्यआलापल्लीत वीर बाबुराव शेडमाके यांना आदरांजली...

आलापल्लीत वीर बाबुराव शेडमाके यांना आदरांजली…

आलापल्ली – वीर शहीद 1857 च्या स्वातंत्र्य उठावाचे योद्धा बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके यांच्या पुण्यतिथी निमित्त आलापल्ली येथिल विर बाबुराव चौकात वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्यानंतर दिवंगत वैद्यकीय अधिकारी डॉ.”किशोर नैताम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी झालेल्या कार्यक्रमा प्रसंगी आल्लापल्ली चे सरपंच शंकर मेश्राम, मार्गदर्शक भिमराव आत्राम गुरुजी ,बालाजी गावडे माजीसरपंच येरमनार प्रामुख्याने उपस्थित होते. अध्यक्षिय पुष्प शंकर मेश्राम यांनी गुंफले ‘

यावेळी दिवंगत वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर नैताम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी मित्र परिवाराच्या वतीने भीमराव जुनघरे यांनी मनोगत व्यक्त केले याप्रसंगी डॉ. किशोर रावजी नैताम यांचा पुर्ण परीवार व मित्र परिवार आवर्जुन उपस्थित होता.

एक अभ्यासू व्यक्तिमत्व सामाजिक जाणीव,प्रगल्भ बुद्धी असणारा. अडीअडचणीप्रसंगी 24 तास आरोग्य सेवा देणारा तत्पर व्यक्ति .सर्वांप्रती दया भाव ठेवणारा करुणेने ओतप्रेत भरलेल्या अ ष्टपैलु व्यक्तिमत्वा चा धनी असलेल्या मित्राच्या अचानक निघुन गेल्याने संपुर्ण मित्र परीवाराचे श्रद्धांजली दरम्यान डोळे पाणावले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालाजी गावडे यांनी तर सुत्रसंचालन व आभार कैलास कोरेत यांनी केले .

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: