Sunday, December 22, 2024
Homeराज्यसिरसोलीच्या युद्धभूमीवर इंग्रज मराठा युद्धातील वीरांना मानवंदना...

सिरसोलीच्या युद्धभूमीवर इंग्रज मराठा युद्धातील वीरांना मानवंदना…

कॅप्टन सुनील डोबाळें सह मान्यवरांची उपस्थिती…

अकोट – पावसाच्या अडथळ्याला न जुमानता व दरवर्षीचा नित्यनेम न चुकविता सिरसोलीच्या युद्धभूमीवर इंग्रज मराठा युद्धातील वीरांना मानवंदना देण्यात आली. युद्धातील वीरांना नमन करण्यासाठी दिवसभर नागरिक युद्धभूमीवर येत होते. कॅप्टन सुनील डोबाळेंसह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा मराठा शौर्य दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी भारतीय सैन्यातील सेवानिवृत्त सैनिकाचा सत्कार करण्यात आला.

1803 मध्ये मराठा इंग्रज यांच्यात अकोला जिल्ह्यातील अकोट शहराजवळील शिरसोली येथे घनघोर युद्ध झाले होते. मराठ्यांच्या शौर्याने हे युद्ध अजरामर झाले. या युद्धाचे नेतृत्व करणारा जनरल वेलेस्ली याने या युद्धातील मराठ्यांचे युद्धनीती चा वापर करून वॉटरलू येथे नेपोलियनचा पराभव केला होता. असे त्याने खुद्द लिहून ठेवलेले आहे.

एवढा भीम पराक्रम मराठ्यांनी या युद्धात केला होता सतत सात दिवस मराठा सैनिकांकडे पारंपारिक शस्त्र व इंग्रजांकडे बंदूक ,तोफा असे आधुनिक शस्त्र असतांनाही अठरापगड जातीतील सैनिक प्राणपणाने लडले.हजारो मराठे या ठिकाणी धारातीर्थी पडले होते. माय भूमीच्या रक्षणासाठी मराठ्यांनी ज्या भूमीवर रक्त सांडले त्या भूमीवर दरवर्षी 29 नोव्हेंबर रोजी शौर्य दिन साजरा करण्यात येतो यावर्षी पावसामुळे युद्धभूमीवर जाण्याकरिता मोठा अडथळा निर्माण झाला होता.

मात्र यावर मात करून 29 नोव्हेंबर शौर्य दिन आयोजन समितीने मोठ्या संख्येने जाऊन श्रद्धांजली अर्पण केली या कार्यक्रमांमध्ये भारतीय सेना दलात निवृत्त झालेले सैनिक देविदास काजगे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या आयोजना मागची भूमिका आर्किटेक्ट अनंत गावंडे यांनी यावेळी विशद केली तदनंतर कॅप्टन सुनील डोबाळे, देविदास काजगे दिलीप बोचे,वाल्मीक भगत, संघर्ष सावरकर यांची समायोजित भाषणे झाली.

या युद्धात शौर्य गाजवून धारातीर्थी पडलेले सरसेनापती कर्तारजीराव जायले यांचे वंशज योगेश जायले, तुषार जायले, पंकज जायले अशोक महाराज जायले यांचे सह अवी गावंडे, नगरसेवक मनीष कराळे, प्रवीण डीक्कर, गोपाल मोहोड, अवी डिक्कर, निलेश नागमते, ऋषिकेश खोटरे संतोष ताकोते, डॉ. मनीषा मते, शिवचरण बानेरकर,प्रवीण भगत, वैभव आखरे, माजी सैनिक सुरेश वाघमारे,

राजेंद्र सपकाळ, उद्धवराव विखे, रामचंद्र पवार, सोपान आखरे, गणेश चौखंडे गणेश आखरे, प्रदीप सोनकासकर, गोपाल जायले, राजू पाटील गावंडे, दीपक आखरे, आकाश आखरे,निलेश ठाकरे, चेतन , तुळशीराम तायडे ,ज्ञानेश्वर निमकर्डे ,गोपाल इरपाते, सोपान रेळे ,धनंजय तायडे, सागर रेळे, योगेश वाकोडे, अरविंद बानेरकर, योगेश काळे, शिवा भगत यांची यावेळी उपस्थिती होती.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: