जागतीक आदीवासी दिनानिमित्त ९ आॅगस्ट शासकीय सुट्टी – हरीश उईके यांच्या प्रयत्नांना यश…
रामटेक – राजु कापसे
गोंडवाना गणतंत्र पक्षाचे प्रदेश अध्यक्ष तथा जि.प.सदस्य हरीश उईके यांनी जागतिक आदिवासी दिवस ९ ऑगस्ट ला महाअधिकार रॅली काढुन साजरा करणार असल्याचे सांगितले आहे. अनेक जागी आदिवासी बांधवांवर अत्याचार होत आहे. सरकार बघ्याची भुमिका घेत आहे. शिकलेला बेरोजगार वनवन भटकत आहे पर्यटकाकरीता उभारलेला व्याघ्र प्रकल्पात वन्य पाळीव प्राणी मानवी जिवाची हत्या करित आहे तर अनेक आदिवासी गावाचे स्थलांतर करण्यात येत आहे,
त्यामुळे आदिवासी बांधवांची दैनाअवस्था होत आहे यासह अनेक प्रश्नाचे उत्तरे सरकारकडून घेणे आहे. यासाठी ९ ऑगस्टला एसडीएम मार्फत निवदेन देण्यात येणार आहे विषेश म्हणजे आदिवासी या देशाचा मुळ निवासी आहे त्याच्या आदिवासी दिनी सार्वजनिक सुट्टी जाहिर करावी असा ठराव नागपूर जिल्हा परिषदने पारीत केला असुन जिल्हाअधिकारी यांचे कडे पाठविण्यात आला आहे.
महारॅलीच्या आमच्या प्रमुख मागण्या याप्रमाण आहे. आदिवासी समाजात काही बोगस आदिवासी घुसुन ते आरक्षणाचा लाभ घेत आहे त्यांचे आरक्षण रद्द करावे व त्यांचे आरक्षण खऱ्या आदिवासींना देण्यात यावे विविध योजनांमध्ये आदिवासी बांधवांना ४० टक्के सबसिडी देण्यात यावी वन भागात राहणारे आदिवासी बांधवावार वन्य जिव हल्ला करतात त्यांच्या रक्षणासाठी उपाय योजना करण्यात यावी व त्यांना ५० लक्ष रूपये नुकसान भरपाई देण्यात यावी.
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस सर्व देशभरात साजरा करण्यात येतो त्या दिवशी सुटी जाहिर करण्यात यावी नागपूर जिल्हयातील रामटेक व पारशिवनी तालुक्यातील २०० गावात मोठया संख्येने आदिवासी बांधव राहतात त्यांना असा कायदा लागू करावा. वन्य जिव हल्ले करतात त्या गावात आदिवासी बांधवाना ५० लाख रूपये अनुदान देण्यात यावे, रामटेक व पारशिवनी तालुक्यात ५० टक्के आदिवासी बांधव राहतात त्यामुळे हा विधानसभा मतदार संघ कायम आदिवासी बांधवांसाठी राखीव ठेवण्यात यावा, देवलापार मंडळ संपुर्ण आदिवासी म्हणून येथे तहसिल कार्यालय सुरू करावे, वन्य जिव अंर्तगत बफरझोन व कोर झोन मध्ये जे आदिवासी युवक काम करतात त्यांना नियमीत करण्यात यावे,
देवलापार येथे ग्रामीण रुग्नालयात चांगल्या आरोग्य सुविधा उभारण्यात याव्या येथे ट्रामा केअर सेंटर ची उभारणी करण्यात यावी तसेच आदिवासी क्षेत्रात उद्योग व व व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रयत्न करावे सह अन्य मागण्या करण्यात आल्या आहे. तसेच शितलवाडी झेंडा रोहन कार्यक्रम व रेली गंगा भवन येथे समारोप झाला. कार्यक्रमाला विजय कोकोटे शिक्षण अधिकारी, प्रभाकर सलामे, सौ दुर्गाताई सयाम माझी सभापती जिल्हा परिषद नागपूर, मधुकर वरखडे, अशोक उईके, दुर्वे सर ,पुप्पा सलामे सो वरखडे ताई, व आदिवासी बंधु- भगीनी उपस्थीत होत्या.