रामटेक – राजु कापसे
रामटेक – पारशिवनी तालुक्यातील कोतीतमारा या आदिवासी भागात अनेक वर्षापासुन आदिवासी मंत्री यांचा दौरा झाला नव्हता,परंतू माझ्या विनंतीला मान देऊन आदिवासी विकास मंत्री मा.डॉ.विजयकुमार गावित यांनी माझ्या मतदार संघातील विविध ठिकांनाना भेट दिली. सर्वप्रथम पारशिवणी तालुक्यातील कुँवारा भिवसेन देवस्थान येथे मंत्री मा.डॉ. विजयकुमार गावित यांच्यासह भेट देऊन पूजन करुन आशीर्वाद घेतला.
यानंतर कुँवारा भिवसेन ते कोलितमारा पर्यंत पेंच जलाशयातून बोटीने प्रवास करत असतांना मंत्री महोदय यांना प्रवासा दरम्यान कुँवारा भिवसेन देवस्थान व या परिसराबाबत माहीती दिली. कोलितमारा येथे पोहोचताच गावकऱ्यांकडुन आदिवासी नृत्यं करत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. तसेच मंत्री महोदय यांच्यासह शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, कोलीतमारा येथेभेट देऊन आश्रमशाळेची पाहाणी केली. येथील विद्यार्थ्यांशी शाळेच्या व्यवस्थेबाबत संवाद साधाला.
तसेच गावातील एकही मुलगा/मुलगी शाळेत जाण्यापासुन वंचित राहू नये, असे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देखील दिले. त्यानंतर आश्रमशाळेतील विधार्थीं व शिक्षकांसोबत फोटो काढली. त्यानंतर वन विभागातील कार्यालय, येथे गावातील आदिवासी माहिलांच्या कास्ट सर्टिफिकेट, रेशन कार्ड व स्वयंरोजगार संदर्भात चर्चा केली व त्यांच्या विविध समस्यांबाबत जाणुन घेतल्या.
यावेळी रामटेक विधान सभा चे आमदार अँड. आशिष जयस्वाल, उपविभागीय अधिकारी सौ.वंदना सवरंपते, तहसीलदार श्री.भंडारकर, प्रकल्प अधिकारी श्री.नितिन इसोकर, माजी अध्यक्ष प्रकल्प स्तरीय आढावा समिती श्री.शिवा कोकोडे, श्री.प्रेम भोंडेकर, श्री.ललित घंगारे, सरपंच सौ.उल्मुले, माजी सरपंच श्री.झोलबा ईनवाते, श्री.विजय कुंभरे, श्री.चंदु भलावी, श्री.धनराज शेंद्रे, श्री.सुरेश बघमारे, श्री.तुळशीराम दूनेदार सह आदिवासी बांधव व गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते.