Sunday, December 22, 2024
Homeराज्यआलापल्ली येथे आदिवासी सांस्कृतिक युवा महोत्सव संपन्न...

आलापल्ली येथे आदिवासी सांस्कृतिक युवा महोत्सव संपन्न…

आलापल्ली – अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथील क्रीडा संकुल येथे संपन्न झालेल्या दोन दिवसीय अखिल भारतीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सव 2023 मध्ये विद्यार्थी व युवक युवतींच्या कलागुणांना वाव देण्याकरीता विविध स्पर्धा व मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले.

मॅरेथॉन व वॉकथॉन स्पर्धेने सदर युवा महोत्सवाला सुरुवात झाली. या स्पर्धेचे उदघाटन अहेरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड यांच्या हस्ते रिबीन कापून करण्यात आले. मॅरेथॉन स्पर्धा पुरुष गटात प्रथम क्रमांक सूरज बोटरे, द्वितीय क्रमांक राकेश चौधरी तर तृतीय क्रमांक तुषार गावतुरे यांनी पटकाविले.

मॅरेथॉन स्पर्धा महिला गटात प्रथम अंकिता मडावी, द्वितीय निकिता मडावी तर तृतीय क्रमांक रविना गावडे यांनी पटकाविले. वॉकथॉन स्पर्धा पुरुष गटात प्रथम पीयुष सोनुले, द्वितीय सौरभ कन्नाके तर तृतीय क्रमांक पितांबर मुत्तेवार यांनी पटकाविले व महिला गटात माया खांडेकर यांनी प्रथम क्रमांक पकाविले.

चित्रकला स्पर्धेत काजल मडावी प्रथम, अनुप माझी द्वितीय तर रमाकांत दुर्गे यांनी तृतीय क्रमांक पटकाविले. हस्तकला स्पर्धेत विजया कोरेत प्रथम क्रमांक पटकाविले. आदिवासी नृत्य स्पर्धा एकल गटातून अनुप माझी प्रथम, प्रणाली मडावी द्वितीय तर निखलेशा कुमरे तृतीय क्रमांक पटकाविले, आदिवासी नृत्य स्पर्धा खुल्या गटातून धोडुर ग्रुप एटापल्ली प्रथम, राणी दुर्गावती ग्रुप द्वितीय तर मैथिली ग्रुप तृतीय क्रमांक पटकाविले.

त्यानंतर पहिल्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात गडचिरोली जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेले शास्त्रज्ञ डॉ. भास्कर हलामी यांनी अमेरिकेतून थेट व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे परदेशी शिक्षणावर युवकांना विशेष मार्गदर्शन व आदिवासी गोंडी भाषेतून संवाद साधून गडचिरोली जिल्ह्यातील विविध समस्यांवर युवकांशी चर्चा करून प्रत्येक युवकाने पुढे उच्च धेय ठेवून प्रयन केल्यास गडचिरोली जिल्ह्याचा विकास शक्य आहे असे मत व्यक्त केले.

दुसऱ्या दिवसाची सुरुवात विविध विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन अंतर्गत प्राध्यापक निरज खोब्रागडे व प्राध्यापक रामराव नन्नावरे यांनी आर्थिक विकास या विषयावर मार्गदर्शन केले तर सुप्रीम कोर्टाचे वकील ॲड. संदीप पणीग्रही यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आदिवासींचे हक्क व कर्तव्ये या विषयावर मार्गदर्शन व युवकांशी संवाद साधले.

बॉडी आर्ट कार्यशाळा संघमित्रा मुखर्जी,पश्चिम बंगाल यांनी घेतले.त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील आधुनिक जीवनशैली व औद्यगिकीकरणातून आदिवासींच्या मूळ जीवनशैलीचा ऱ्हास होतोय? या विषयावर आयोजित वादविवाद स्पर्धेत खुर्शीद शेख प्रथम, आनंद अलोने द्वितीय व ओंकार आत्राम तृतीय क्रमांक पटकाविले.

कला बाजार स्पर्धेत श्रीनिवास कविराजवार यांनी प्रथम क्रमांक पटकाविले. विशेष मार्गद्शन सत्रात अहेरीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कन्ना मडावी यांनी युवकांना मार्गदर्शन करतांना असे उपक्रम गावागावात राबवून युवकांमध्ये जाणीव जागृती निर्माण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले..

त्यानंतर पश्चिम बंगाल वरून आलेले सुशांत दास यांच्या मार्गदर्शनात विविध विषयांवर मुकाभिनयाचे सादरीकरण करण्यात आले, त्यात आध्या गलबले, पृथा येर्रावार मैत्रेय नैताम, शोन नैताम, तुशोद, हार्दिक कोरेत, दिव्या कोरेत, बंटी निमसरकार, तिम्मी तोडसाम यांनी उत्तम सादरीकरण केले.

त्यानंतर घेण्यात आलेल्या ट्रायबल फॅशन शो मध्ये किड्स गटात प्रज्ञा तोडसाम प्रथम, दिव्या कोरेत द्वितीय , पृथा येर्रावार तृतीय क्रमांक व आध्या गलबले यांनी प्रोत्साहनपर बक्षीस पटकाविले. मिस गटात करिश्मा मडावी प्रथम, लेखणी कोरेत द्वितीय व श्रावणी मडावी तृतीय क्रमांक पटकाविले व मिस्टर गटात अमर माझी प्रथम, रमेश मट्टामी द्वितीय, गणेश कोलच्या तृतीय क्रमांक व विजया कोरेत प्रोत्साहनपर बक्षीस पटकाविले.

फॅशन शो करीता मनिषा मडावी, निलेश उईके, श्रावणी उईके, नूतन बानोत व निशा गोवर्धन यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. योग प्राणायाम व विपश्यना करीता सपना वर्मा पंजाब व शैलाताई गोरेकर यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. बक्षिस वितरक म्हणून अहेरीचे पोलिस निरीक्षक काळबांधे व प्रमुख पाहुणे म्हणून आलापल्लीचे सरपंच शंकर मेश्राम उपस्थित होते.

सदर युवा महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाकरीता समितीचे अध्यक्षा डॉ. सुमती नैताम, डॉ. किशोर नैताम, सचिव ॲड. उदय गलबले, डॉ.प्रगती कावळे, सदस्या ममता गलबले, विनोद खांडेकर, माया खांडेकर, ममता सुरपाम, प्रणव पाटील, डॉ. विशाल येर्रावार, निरज खोब्रागडे, आनंद अलोणे व सरपंच शंकर मेश्राम यांनी विशेष परिश्रम घेतले. युवा परिषदेच्या सूत्रसंचलनाची भूमिका रामदास कोंडगोर्ला यांनी पार पाडले व दोन दिवसीय आदिवासी सांस्कृतिक युवा महोत्सव यशस्वीरीत्या संपन्न झाला.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: