पातुर – निशांत गवई
महावितरणच्या व ठेकेदाराच्या चुकीमुळे झाडांची कत्तल…
पातुर तालुक्यातील आलेगाव मेहकर रस्त्यावर असलेल्या बेलतळा, पळसखेड, आसोला, कार्ला, आलेगांव, मळसुरफाटा, पिंपळडोळी, पेढका या सर्व गावात जाणाऱ्या रस्त्याच्या बाजुला महावितरण चे नविन खांबे (पोल) उभे करणे व त्या पोलवर तार लावण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.कामामुळे त्या महावितरण महामंडळ च्या ठेकेदारने काम घेतले आहे ते खांब अत्यंत चुकीच्या पद्धतीने लावल्या असल्यामुळे झाडे तोडावे लागतात आहे.अशी तक्रार करण्यात आली आहे.
पातूर तालुक्यामध्ये रोजगार हमी योजने अंतर्गत ३० मे पर्यंत प्रत्येक गावामध्ये लाखो रूपयाचे कामे करण्यात आली. रोजगार हमी योजने मार्फत रस्त्याच्या दोन्ही बाजुला शासनाने प्रत्येक गावच्या ग्रामपंचायतीला झाडे लावली आहेत . काही झाडे ही ४ ते १५ वर्षाच्या वयाची आहेत. एकीकडे शासनाकडून झाडे लावा झाडे जगवा चे संदेश दिले जात आहेत.
तर दुसरीकडे या झाडांची कत्तल केली जात आहे.तर काही ठिकाणी झाडाच्या फांदया तोडत आहेत.महावितरण व ठेकेदारांनी आपले खांब झाडाच्या बाजूला उभे करावे व आतापर्यंत उभे केलेले खांब काढून घेण्यात यावे. हा प्रकार तात्काळ थांबवण्याची मागणी. ग्राम विकास कांती दल च्या संस्थापक अध्यक्ष भाईरत्न कांबळे यांनी निवेदनातून केली आहे. हे काम थांबवलं नाही तर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल असा सुद्धा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
झाडे तोडले जाणार नाही याची दक्षता घ्या वन विभागाने दिले महावितरण व ठेकेदाराला दिले आहेत. बेलतळा, पळसखेड, आसोला, कार्ला, आलेगांव, मळसुरफाटा, पिंपळडोळी, पेढका या सर्व गावात जाणाऱ्या रस्त्याच्या बाजुला महावितरण महामंडळ चे नविन खांबे पोल उभे करणे इलेक्ट्रीक पोल खांच उभे करणे सुरु आहे. सदर पोल उभे करतांना कोणतेही पूल बाधित होणार नाही किंवा झाडे तोडले जाणार नाही याची दक्षता येण्याचे आदेश वन विभागाने दिले आहे.