पातूर – निशांत गवई
पर्यावरणाचा समतोल ठेवण्यासाठी व गाव पातळीवर गोरगरिबांना मजुरी उपलब्ध व्हावे या उद्देशाने शासनाने गेल्या अनेक वर्षापासून वृक्ष लागवडीची मोहीम सुरू केली, परंतु लचखोरीमुळे पातुर तालुक्यात वृक्ष लागवड संगोपणावर शासनाची कोट्यावधी रुपयांची लुबाडणूक होत असल्याचा आरोप शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष दिलीप परनाटे यांनी ५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या तक्रारीतून केला आहे.
वृक्ष लागवडीच्या संगोपणावर कोट्यवधी रूपांचे देयक काढणे सुरू आहे. देयक काढण्यासाठी हजारो रुपयांची लाच घेतली जात असल्याने वृक्ष लागवड मोहिमेचा फज्जा उडाल्याचे चित्र असून, अभियंता ऑपरेटर यांच्या बँक खात्याची व या सर्व प्रकाराची चौकशी करा अन्यथा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष दिलीप परनाटे यांनी दिला आहे.सदर आरोपावर अभियंता यांच्याशी विचारणा केली असता, त्यांनी आरोप फेटाळले,
वृक्ष लागवडीची वाढ का खुंटली ?
गेल्या अनेक वर्षापासून पातुर तालुक्यातील ग्रामपंचायत अंतर्गत वृक्ष लागवड करण्याची मोहीम गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे.मात्र वृक्ष लागवडीची वाढ तीन ते पाच फुटापर्यंतच आहे. कोट्यावधी रुपये काढल्यानंतरही वृक्षाची वाढ का खुंटली असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वरिष्ठांच्या नावावर अभियंता व ऑपरेटर यांनी घेतली लाच
वृक्ष लागवडीचे देयक काढण्यासाठी अभियंता व ऑपरेटर यांनी वरिष्ठांच्या नावावर एका रोजगार सेवकाकडून फोन पे वर हजारो रुपयांची लाच घेतल्याचे उघडकीस आले, त्यामुळे त्यांच्या खात्याची चौकशी करण्याची गरज आहे.