Friday, September 20, 2024
Homeराज्यमोदुमडगू येथील आनंद आश्रम येथे वृक्षारोपण...

मोदुमडगू येथील आनंद आश्रम येथे वृक्षारोपण…

अहेरी – मिलिंद खोंड

नागेपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मोदुमडगू येथील आनंद आश्रम येथे वृक्षारोपण चा कार्यक्रम घेण्यात आला.
आलापल्ली येथील माँ विश्वभारती सेवा संस्थे तर्फे वेलगूर रोड वरील मोदुमडगू येथे वृद्धाश्रम अनाथाश्रम व महिला बचत गटासाठी इमारत बांधकाम सुरू आहे.

या आनंद आश्रम च्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते विविध झाडांच्या रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी प्रगती मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक च्या डॉ.प्रगती कावळे, माँ विश्वभारती सेवा संस्थेचे अध्यक्ष चंद्रकिशोर पांडे,सामाजिक कार्यकर्ते अज्जू पठाण,डॉ.अंतरिक्ष कावळे, आदी. ची उपस्थिती होती.

यावेळी नागेश उरेत या युवकाचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. या निमित्ताने युवकाने दोन वृक्षांची संगोपन करण्याची जबाबदारी घेतली. या कार्यक्रमाला सज्जू शेख,टिकू रायकुंडलिया, मुकेश सरकार, विष्णू कुशवाहा , शेख राजेश बानाला,आदी मंडल, तरुण मंडळ ,सुरेश मडावी आदी.सह सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: