Saturday, November 23, 2024
Homeवनजीवनबृहन्मुंबई महानगरपालिका, वृक्ष प्राधिकरण आणि मेक अर्थ ग्रीन (MEGA) फाउंडेशनच्या सहकार्याने खेरवाडी...

बृहन्मुंबई महानगरपालिका, वृक्ष प्राधिकरण आणि मेक अर्थ ग्रीन (MEGA) फाउंडेशनच्या सहकार्याने खेरवाडी (वांद्रे) येथे पश्चिम द्रुतगती महामार्गालगत वृक्षारोपण…

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी आणि अभिनेता श्री. अक्षय कुमार यांची प्रमुख उपस्थिती

पर्यावरण संतुलनासाठी २०० बहावा वृक्षांची करणार लागवड

मुंबई – गणेश तळेकर

मुंबई महानगराचे पर्यावरण संतुलन टिकवून ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सतत नवनवीन उपक्रम राबवित असते. या उपक्रमांतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका, वृक्ष प्राधिकरण आणि मेक अर्थ ग्रीन (MEGA) फाउंडेशनच्या सहकार्याने खेरवाडी (वांद्रे) येथे पश्चिम द्रुतगती महामार्गालगत सोमवारी (दिनांक २४ जून २०२४) २०० बहावा वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी आणि अभिनेता श्री. अक्षय कुमार यांच्या हस्ते सोमवारी सकाळी ९ वाजता हे वृक्षारोपण पार पडणार आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून अभिनेता अक्षय कुमार हे त्यांचे दिवंगत वडील हरी ओम भाटिया आणि आई अरुणा भाटिया यांना श्रद्धांजली वाहणार आहेत. या कार्यक्रमाला उप आयुक्त (परिमंडळ ३) श्री. विश्वास मोटे आणि मेगा फाउंडेशनच्या डॉ. अनुषा श्रीनिवासन अय्यर आदींसह महानगरपालिकेच्या उद्यान विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

ही वृक्षारोपण मोहीम मुंबईला हरित ठेवण्यासाठी राबविण्यात येत आहे. तौक्ते चक्रीवादळानंतर अनेक वृक्षांची पडझड झाली. त्यामुळे पर्यावरणाने नुकसान भरून काढण्यासाठी ‘झाडांचा खड्डा स्वीकारा आणि निसर्गाचे पालक बना’ या मोहिमेत आतापर्यंत ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर, शत्रुघ्न सिन्हा, अभिषेक बच्चन, अनुपम खेर, बप्पी लाहिरी, अजय देवगण आणि त्यांचा मुलगा युग देवगण, सोनू निगम, संग्राम सिंह, रणवीर शौरी आणि त्यांचा मुलगा हारून शौरी, रोहित शेट्टी तसेच ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती हेमा मालिनी, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, आयेशा झुल्का आदींनी सहभाग नोंदविला आहे.

Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: