Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीचाकुच्या धाकावर ट्रॅव्हल्स मधील प्रवाशांना लुटले - नागपुर ते आमडी रस्त्यादरम्यानची घटना...

चाकुच्या धाकावर ट्रॅव्हल्स मधील प्रवाशांना लुटले – नागपुर ते आमडी रस्त्यादरम्यानची घटना…

१,९६,७५० रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार

तिन आरोपींना केले रामटेक पोलिसांनी जेरबंद

रामटेक – राजु कापसे

प्रवासादरम्यान खाजगी ट्रॅव्हल्समधील प्रवाशांना चाकुचा धाक दाखवुन लुटल्याची घटना नुकतीच १४ ऑक्टोंबर ला नागपुर ते आमडी मार्गादरम्यान घडली. यावेळी आरोपींनी एकुन १,९६,७५० रुपयांचा ऐवज लुटुन पसार झाले. फिर्यादीच्या तक्रारीवरून रामटेक पोलिसांनी गुन्हे नोंद करून तिन आरोपींना अटक केलेली आहे.

फिर्यादी नामे सिध्दार्थ सत्येंन्द्र पांडे हा सिंकदराबाद येथुन दि. १३ ऑक्टोंबर रोजी आपल्या गावी जाण्याकरीता जि.एस. आबा टुर्स अँन्ड ट्रॅव्हल्स नंबर TS ११२ UC ९१६५ मध्ये ३२०० रुपये तिकीट घेवुन बसमध्ये बसुन गावी जात असता त्याचे सोबत हैद्राबाद येथुन आनखी ८० लोक सोबत बसले होते. ती ट्रॅव्हल्स दि. १४ ऑक्टोंबर रोजी नागपुर येथे पोहचली.

तेव्हा फिर्यादी व त्याच्या सोबत असलेले ८० लोकांना त्या ट्रॅव्हल्स मधुन उतरवुन दुसरी ट्रॅव्हल्स क्रमांक – MP- १७ P १०५५ मध्ये बसवुन गावी जाण्याकरीता सांगीतल्याने ते सर्व लोक ट्रॅव्हल्स क्रमांक – MP- १७ P १०५५ बसले त्याच्या सोबतच त्यावेळी त्या ट्रॅव्हल्स मध्ये २ व्यक्ती बसले त्यानंतर नागपुर च्या समोर पेट्रोलपंपावर ड्रायव्हरने गाडी थांबवली तेव्हा आनखी २ व्यक्ती बसले.

त्यानंतर ट्रॅव्हल्स समोर निघाली तेव्हा ट्रॅव्हल्स मध्ये चढलेले त्या ४ लोकांनी सर्वांना टिकीतचे पैसे मांगायला सुरुवात केली. तेव्हा फिर्यादी व त्याच्या सोबत ट्रॅव्हल्समध्ये असलेले लोंकानी आम्ही तिकीट तर काढली आहे. त्याच्यांसोबत बोलुन घ्या असे म्हटले असता त्या लोंकानी फिर्यादी व ट्रॅव्हल्स मधील लोंकाना मारपीट करायला सुरुवात केली.

ट्रॅव्हलचे दोन्ही ड्रायव्हर, एक परीचालक व ट्रॅव्हल्स मधील चार चढलेले इसमांनी फिर्यादी व ट्रॅव्हल्स मधील लोंकाना चाकु च्या धाक दाखवुन मारपीट करुन जोरजबरदस्तीने फिर्यादी जवळुन ४५०० रुपये व बाकीच्या लोकाकडुन सुध्दा त्यांच्याजवळ असलेले पैसे असे एकुण १९६७५० / रुपये जोरजबरदस्तीने हिस्कावुन घेतले. दुपारी सव्वा वाजताच्या सुमारास ट्रॅव्हल्स आमडी गावा जवळ वाजता थांबली.

तेव्हा ट्रॅव्हल्स चे दोन्ही ड्रायव्हर व परीचालक सोडुन बाकीचे चार लोक ट्रॅव्हल्सचा खाली उतरुन तेथुन पळुन गेले. अशा फिर्यादीच्या तोंडी रिपोर्टवरुन पो.स्टे. रामटेक अपराध क्रमांक – ७५५/ २०२३ कलम ३९५ भारतीय दंड संहीता सहकलम ४, २५ आर्म अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करून तपासात आहे.

सदर गुन्ह्याचा तपास मा. उपविभागीय पोलीस अधिकारी आशित कांमळे रामटेक विभाग तसेच त्याचा मार्गदर्शतान पो.उप नि कार्तिक सोनटक्के पो.शि नितेश डोकरीमारे हे करत असुन सदर गुन्हात सध्या आरोपी क्र.अमन इश्वर इंगळे वय 26 वर्ष रा. रामबाग नागपुर, गुलाब शाबीर शेख वय 32 वर्ष रा. कपील नगर नागपुर, राशीक शेख रफीक शेख वय ३४ वर्ष रा. दिघोरी नागपुर यांना अटक करण्यात आली असुन पुढील तपास रामटेक पोलीस करीत आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: