Sunday, September 8, 2024
spot_img
Homeराजकीयबिलोलीचे तहसीलदार निळे यांच्या बदली व स्थावर आणि जंगम मालमत्तेची चौकशी करा...

बिलोलीचे तहसीलदार निळे यांच्या बदली व स्थावर आणि जंगम मालमत्तेची चौकशी करा – सामाजिक कार्यकर्ते कलमूर्गे यांची मुख्यमंत्री, महसूलमंत्री यांच्याकडे मागणी…

नांदेड़ – महेंद्र गायकवाड

नांदेड़ जिल्हयातील बिलोली तालुक्याचे तहसिलदार , दंडाधिकारी तथा नपचे प्रभारी मुख्याधिकारी श्रीकांत निळे हे अवैध धंद्याला चालना देत जनतेचे कामे करत नसल्यामुळे त्यांची बदली करण्यात यावे आणी त्यांची स्थावर आणी जंगम मालमत्तेची चौकशी करण्यात यावी अशी मागणी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मीकांत कलमुर्गे यानी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटिल, उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना मेल आणी ट्विटर द्वारे पत्र पाठवून केली आहे.

आत्ताच व्हाट्सअप वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट, आपल्या परिसरातील घडामोडी व महत्त्वपूर्ण माहिती त्यासाठी जॉईन करा. 

नांदेड जिल्हयातील बिलोली तालुक्यात वाळू डेपोच्या नावाखाली विना पावती ओव्हर लोड गाड्या कर्नाटक, तेलंगणा पासिंगच्या गाड्या खोट्या लाभार्थ्यांच्या नावाने खुलेआम वाळू रात्रंदिवस घेऊन जात आहेत. विशेष म्हणजे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, महसूलचे नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यासह पोलीस उपविभागीय अधिकारी यांचे पथक, बिलोली पोलीस ठाणे , स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व महसूलचे बैठे पथक व आर. टी. ओ चे अधिकारी एवढे असताना परराज्यातील ठेकेदार, वाहनधारक महाराष्ट्रातुन विना पावती, ओव्हर लोड गाड्या सर्वांच्या डोळ्यादेखत खुलेआम घेऊन जात आहेत.

बिलोली तालुक्याचे तहसिलदार , दंडाधिकारी तथा नपचे प्रभारी मुख्याधिकारी श्रीकांत निळे यांनी पदभार घेतल्यापासून तालुक्यातील गोरगरीबांच्या समस्याकडे दुर्लक्ष करून रेती, माती, मुरूम माफीया व राजकीय पुढाऱ्यांना महत्त्व दिले जाते.  म्हणून अशा लोकांशी जवळीकता वाढली असल्याने  तालुक्यात अवैध धंद्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. म्हणून श्रीकांत निळे यांचा नपचा प्रभारी पदभार काढून कायमस्वरुपी मुख्याधिकारी द्यावा तसेच तहसिलदार पदावरून श्रीकांत निळे यांची तालुक्यातून बदली करण्यात यावी अशी मागणी तालुक्यातील नागरिकांच्या वतीने करत आहे.

जिल्ह्यातील सगळ्या तालुक्यापेक्षा अधिक महसूल देणारा तालुका म्हणजे बिलोली आहे. या तालुक्यात पदभार घेण्यासाठी अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठी धडपड असते, कारण आतापर्यंत इथे आलेला अधिकारी कमी दिवसात बेहिशोबी मालमत्ता जमविण्यात यशस्वी झाला आहे. यासाठी बिलोलीच्या नशीबी असे अधिकारी लाभत असतात. मात्र  तत्कालीन तहसिलदार विक्रम राजपुत यांच्या काळात भूमाफीया तहसिल कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांशी आर्थिक मांडवली करण्याची हिंमत होत नव्हती. 

पण आता मात्र बिनधास्तपणे कार्यालयात आर्थिक तडजोड केली जात आहे. खरेतर तहसिलदार श्रीकांत निळे हे रुजू झाल्यापासून जनतेशी कमी पण अवैध धंदेवाल्यांशी जवळीकता जास्त प्रमाणात वाढली आहे. यामुळे रेती, मुरूम, मातीचे अवैध धंदे बिनधास्त चालत आहेत. राजपुत यांच्या काळात अवैध धंद्याच्या दंडात्मक कारवाईत शासनाला वर्षाकाठी लाखो रूपयांचा महसुल मिळून  देऊन अवैध धंदेवाल्याच्या मुसक्या आवळ्याल्या म्हणून त्या काळात तालुक्यात अवैध दंद्याला पुर्णपणे लगाम लागला होता.

आता तहसिल कार्यालया समोरून रात्रंदिवस रेती, माती, मुरूमाची अवैध वाहतूक होत आहे, तरी महसुल प्रशासन झोपेच सोंग घेवून या तस्करांना पाठीशी घालत आहेत. विशेष म्हणजे  तहसिलदार निळे हे पदभार घेतल्यापासून अवैध धंद्यावर दंडात्मक कारवाईच्या माध्यमातून अद्यापही शासनाला महसूल मिळवून दिले नसल्याचे बोलल्या जाते. महत्त्वाचे म्हणजे तालुक्यात रेतीसह विविध प्रकारचे अवैध धंदे वाल्यांची जवळीकता वाढली आहे, तालुक्यातील  जनसामान्य व शेतकरी  विविध अडचणी, तक्रारी घेवून तहसिलदार यांच्या दालणात गेल्यास तहसिलदार यांच्याकडून सामान्य नागरीकांचा अपमान केल्याची बाब समोर आली.

तक्रारी घेऊन जाणाऱ्यांना  तुम्ही एकदा तक्रार दिली त्याचे आम्ही आमच्या स्तरावर बघू पण ह्याच कामासाठी परत परत माझ्या दालणात येऊ नका, म्हणून नागरीकांना बाहेर हाकलून लावण्यात येते. पण रेती, माती, मुरूम माफीयांना दालणात आसन व्यवस्था व चहा, पाण्याने  सन्मान करून पाठविले जाते. या कार्यप्रणालीमुळे जन सामान्याची मोठ्या प्रमाणात  हाल होताना दिसून येते. म्हणून अशा तहसिलदाराची चौकशी करून बिलोली तालुक्यातून बदली करण्याची मागणी बिलोली वासियांच्या वतीने करण्यात येत आहे. त्याच सोबत स्थावर आणी जंगम मालमत्तेची चौकशी करण्यात यावे अशी मागणी लक्ष्मीकांत कलमुर्गे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Mahendra Gaikwad
Mahendra Gaikwadhttp://mahavoicenews.com
Mahendra Gaikwad महेंद्र गायकवाड, पाटबंधारे नगर तरोडा (बु) नांदेड, मी गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात असून आजपर्यंत राजकीय, सामाजिक, क्राईम, अनेक विषयावर वृत्त लेखण केले आहे. अनेक पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: