Monday, December 23, 2024
Homeराज्यपारंपारिक मच्छीमार बचाव कृती समितीचा विजयी मेळावा...

पारंपारिक मच्छीमार बचाव कृती समितीचा विजयी मेळावा…

१६३० कुटुंबियांचा यशस्वी संघर्ष, १७ वर्षाच्या लढ्याला आले यश.

मच्छिमार बांधवाच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र स्मॉल स्केल ट्रेडिशीनल फिश वर्कर्स युनियनची स्थापना.

मुंबई – उरण मोरा प्रवाशी धक्का व JNPT शेवा यांच्या दरम्यानचे मासेमारी जमिनीत NMSEZ ने प्रवाशी व इतर धक्के बांधण्याची योजना आखली होती. त्या मासेमारी जमिनीचे भुईभाडे JNPT ला देण्याचा NMSEZ व JNPT या दोन कंपन्यात करार झाला होता. म्हणून JNPT ने NMSEZ ला प्रवाशी व इतर धक्के बांधण्याची परवानगी दिली होती. त्या वेळी पारंपारिक मच्छिमार बचाव कृती समितीने मासेमारी जमिनीचा मोबदला पारंपारिक मच्छिमारांनी जेएनपीटी प्रशासनाला मागितलेला होता.मात्र मच्छीमारांना मोबदला देण्यात आला नाही.

तसेच पुनर्वसनही करण्यात आलेले नव्हते.2005 सालापासून मच्छिमार बांधव आपल्या मागण्यासाठी लढत होते शेवटी डिसेंबर 2022 मध्ये या लढ्याला यश मिळाले असून सर्वोच्च न्यायालय दिल्लीने मच्छिमार बांधवाना नुकसान भरपाई देण्याचे आदेश जेएनपीटी व संबंधित कार्यालयांना दिले.

त्या अनुषंगाने विजयाचा जल्लोष करण्यासाठी व हा लढा अधिक तीव्र करण्यासाठी पारंपरिक मच्छिमार बचाव कृती समिती तर्फे दिनांक 25/12/2022 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत हनुमान मंदिर, हनुमान कोळीवाडा, उरण येथे मच्छीमारांचा विजयी मेळावा संपन्न झाला.

सर्वोच्च न्यायालयात केस जिंकल्याने उरण हनुमान कोळीवाडा येथे विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रमेश कोळी,अरुण शिवकर, नंदकुमार पवार, रामदास कोळी,प्राची कोळी, कैलास कोळी, भारत कोळी, लक्ष्मण कोळी, दिलीप कोळी, एडव्होकेट गोपीनाथ पाटील (कायदेविषयक सल्लागार ), प्राध्यापक गीतांजय साहू (टाटा सामाजिक संस्था मुंबई ),परमानंद कोळी,सुरेश कोळी, रमेश कोळी, मंगेश कोळी,कृष्णा कोळी आदी पारंपारिक मच्छिमार बचाव कृती समितीचे पदाधिकारी सदस्य यावेळी उपस्थित होते.

यावेळी विजयी मेळाव्यात 2005 पासून ते 2022 पर्यंत कश्या पद्धतीने लढा देण्यात आला याविषयी माहिती देण्यात आली. या मेळाव्यात उरण पनवेल तालुक्यातील तसेच हनुमान कोळीवाडा, उरण कोळीवाडा, बेलपाडा कोळीवाडा, गव्हाण कोळीवाडा या चार गावातील मच्छिमार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

JNPT, ONGC, CIDCO ने मा.NGT च्या दि.27/02/2015 रोजीच्या आदेशा विरोधात मा. सुप्रीम कोर्टात अपील केले होते. त्या पैकी JNPT ने अपील मागे घेण्याची विनंती मा सुप्रीम कोर्टाला केली होती. तो अपील मागे घेतल्याचे मा. सुप्रीम कोर्टाने मान्य करून मा.जिल्हाधिकारी रायगड याना व्याजासहित रक्कम 1630 कुटुंबांना दोन महिन्यात वाटप करण्याचा दिनांक 14/12/2022 रोजी आदेश दिले आहेत.त्यामुळे प्रत्येक कुटुंबाना 5 लाखाहून अधिक रक्कम नुकसान भरपाई मिळणार आहे.

तर ONGC व CIDCO या कंपनी कडुन 4 लाख रुपये असे एकूण 9 लाख रुपये प्रत्येक कुटुंबाना मिळणार आहे.अशा प्रकारे 2005 पासून सदर मच्छिमार बांधवांनी आपला लढा सुरु केला त्यास 2022 मध्ये म्हणजे तब्बल 17 वर्षांनी यश आले.या यशाबद्दल विजयी मेळावा घेण्यात आला. त्यास उत्तम प्रतिसाद देखील मिळाला.

मच्छिमारांवर वेळोवेळी अन्याय होत असल्याने मच्छिमार बांधवांना एकत्रित करून मच्छिमार बांधवांच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी,अन्यायाच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी, मासेमारी करणाऱ्यांना मोबदला मिळवून देण्यासाठी वरिष्ठ वकिलांच्या सल्ल्याने पारंपारिक मच्छिमार बचाव कृती समितीच्या पदाधिकारी सदस्यांनी व मच्छीमारांनी एकत्र येत महाराष्ट्र स्मॉल स्केल ट्रॅडिशनल फिश वर्कर्स युनियनची स्थापना केली .या युनियनच्या फलकाचे अणावरण यावेळी अरुण शिवकर यांच्या हस्ते करण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: