Thursday, December 26, 2024
Homeराजकीयजनता बाजारातील व्यापारी व विक्रेत्यांचा डॉ.अभय पाटील यांना निवडून आणण्याचा निर्धार...

जनता बाजारातील व्यापारी व विक्रेत्यांचा डॉ.अभय पाटील यांना निवडून आणण्याचा निर्धार…

अकोला महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ अभय काशिनाथ पाटील यांना निवडून आणण्यासाठी जनता भाजी बाजार येथील फळ व भाजी व्यापारी व किरकोळ विक्रेत्यांनी निवडणुकीत विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला. शनिवारी सकाळी माजी नगरसेवक महबूब खान उर्फ मब्बा यांच्या पुढाकाराने महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अभय पाटील यांचा हा प्रचार दौरा जनता भाजी बाजारात संपन्न झाला.

टॉवर चौक परिसरातून प्रारंभ झालेल्या या प्रचार दौऱ्यात जनता बाजारातील प्रत्येक फ्रुट व भाजी व्यापारी, विक्रेते व उद्योजक यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधित ही प्रचार पदयात्रा संपूर्ण बाजारात प्रचार करीत बाजारातील ज्येष्ठ फ्रुट व्यापारी व जेष्ठ समाजसेवी सय्यद उमर सय्यद बाला यांनी आयोजित केलेल्या प्रचार बैठकीच्या रूपाने संपन्न झाली.

जनता बाजाराच्या संपूर्ण समस्यां सोडविण्यासाठी डॉ अभय पाटील हे सक्षम व्यक्तिमत्व असून या निवडणुकीत त्यांनाच विजयी करण्याचे आवाहन महबूब खान उर्फ मब्बा तथा हाजी सय्यद उमर सय्यद बाला यांनी केले. संचालन किरकोळ विक्रेता बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तशवर पटेल यांनी तर आभार हाजी अर्शद खान यांनी केले.

या प्रचार पदयात्रेत जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक अमानकर,इंटकचे प्रदेश पदाधिकारी प्रदीप वखारिया, दिलीप खत्री, चंद्रकांत सावजी, हाजी हमजा खान, आरिफ खान चांदखान, हाजी हर्षद खान दाऊद खान, मुजाहिद खान एम के, इस्माईल खान अहमद खान, मनोहरराव सोनटक्के, मिर्झा झाकीर बेग, धर्मपाल सोनारकर, शेख सईद शेख रसूल, मोहम्मद खालीक, सलीम बेग, विलास गोतमारे समवेत बाजार पेठ मधील बहुसंख्य फ्रुट व भाजी व्यापारी, किरकोळ विक्रेते, उद्योजक, अडते, कमिशन एजंट, स्टॉल धारक आदी उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: