- भारतीय जनसेवा मंडळाच्या प्रयत्न व परीश्रमाला अखेर यश
- उत्तम शोभायात्रा आयोजनामुळे भारतीय जनसेवा मंडळावर कौतुकांचा वर्षाव
- ‘ हिरण्यकश्यप वध ‘ झाकीने पटकाविला प्रथम पुरस्कार
रामटेक – राजू कापसे
त्रिपुर पौर्णिमेदरम्यान प्रख्यात रामनगरी म्हणजेच रामटेक नगरीमध्ये निघणाऱ्या भव्य शोभायात्राचे आयोजन काल दि. ६ नोव्हेंबर ला भारतीय जनसेवा मंडळातर्फे मोठ्या थाटात करण्यात आले होते. यावेळी शोभायात्रेतील एकुण २७ झाक्यांच्या झगमगाटीने संपुर्ण रामनगरी न्हाऊन निघाली असल्याचे चित्र दिसुन आले. यावेळी नागरीकांच्या अलोट गर्दीने जवळपास १ किलोमिटर चा रस्ता तुंबला होता. यावेळी डि.वाय.एस.पी. आशित कांबळे यांनी उत्तम सुरक्षा व्यवस्था सांभाळली होती.
काल दि. ६ नोव्हें. रोजी सायंकाळी पाच वाजता दरम्यान शहरातील अठरा भुजा गणेश मंदिर येथे मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजा अर्चना करून भारतीय जनसेवा मंडळ द्वारा आयोजित भव्य शोभायात्रेला प्रारंभ झाला. यावेळी प्रामुख्याने खासदार कृपाल तुमाने माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक, भारतीय जनसेवा मंडळाचे अध्यक्ष श्री चंद्रपाल चौकसे, माजी आमदार आनंदराव देशमुख, माजी आमदार मल्लिकाअर्जुन रेड्डी आदी. प्रामुख्याने उपस्थित होते.
दरवर्षी त्रिपुर पौर्णिमेनिमित्त निघणाऱ्या शोभायात्रेचा शुभारंभ अठराभुजा गणेश मंदिरापासून होऊन संपूर्ण रामटेक मध्ये भ्रमण करत नेहरू ग्राउंड येथे समापन होत असते. दरम्यान श्री अठराभुजा गणेश मंदीरापासुन शोभायात्रा निघाली, ती शांतीनाथ जैन मंदीर, कालंका माता मंदीर होत पुढे झेंडा चौक, डि.वाय.एस.पी. कार्यालयाकडून तहसिल कार्यालय मार्गे बसस्थानक मार्गे गांधी चौक व येथुन पुढे लंबे हनुमान मंदीर होत नेहरु मैदानावर समापन झाले.
मार्गात अनेक दानदात्यांनी महाप्रसादाचे ठिकठिकाणी वितरण केले. वर्षानुवर्षांची परंपरा आणि शोभायात्रेतील वेगवेगळ्या झांकी या शोभायात्रेची ओळख असून येथे मोठ्या संख्येने भाविक भक्त व रामटेक नगरीतील नागरिक आवर्जुन हजेरी लावत असतात. दरम्यान गांधी चौक रामटेक येथे परीक्षक मंडळींनी सर्व झाक्यांचे परीक्षण करून त्यांना क्रमांक प्रदान केले. संपुर्ण झाक्या रात्री ११.३० वाजता दरम्यान नेहरू मैदानावर पोहोचल्या.
येथे चित्रपट कलावंत शहाबाज खान यांना पहान्यासाठी तथा त्यांचा आवाज व डॉयलॉग ऐकण्यासाठी मोठा जनसागर उपस्थित होता. याप्रसंगी नेहरू मैदानावर भव्य मंच व कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला होता. मंचावर यावेळी अभिनेता शाहबाज खान, माजी राज्यमंत्री सुनील केदार, आमदार आशिष जयस्वाल, माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, भारतीय जनसेवा मंडळ अध्यक्ष तथा पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे, अमोल देशमुख, गज्जु यादव, ऋषीकेश किंमतकर, संजय बिसमोगरे,
संत तुकाराम बाबा, अशोक पटेल, चामलाटे, चंद्रकांत ठक्कर, ज्योतीताई कोल्हेपरा, गोपी कोल्हेपरा, उपविभागीय पोलीस अधिकारी आशित कांबळे, न.प. मुख्याधिकारी मंगेश वासेकर आदी. प्रामुख्याने उपस्थित होते. दरम्यान प्रारंभी मान्यवरांचा स्वागत सत्कार झाला. यानंतर भाषणे झालीत. अध्यक्षीय भाषण भारतीय जनसेवा मंडळाचे अध्यक्ष तथा पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन श्री दीपक गिरधर तथा माजी सरपंच योगिता गायकवाड यांनी केले तसेच आभार प्रदर्शन श्री. चामलाटे यांनी केले.
यानंतर क्रमांक पटकाविणाऱ्या झाक्यांना शहाबाज खान व मान्यवरांच्या हस्ते पारितोषीके देण्यात आली. प्रथम पारितोषीक ‘ हिरण्यकष्यप वध ‘ या झाकीने पटकाविला. त्या झाकीला ३० हजारांचे प्रथम पारितोषीक देण्यात आले.
नंतर सरते शेवटी सिने अभिनेता शहबाज खान यांनी रामनगरीचे गुण गात त्यांना या भव्य कार्यक्रमाला आमंत्रीत केल्याबददल आयोजकांचे आभार मानले व काही डॉयलॉग सादर केल्या. यावेळी चंद्रकांत जी ठक्कर सुभाष बघेले विनायक डांगरे धनराज काठोके सी व्ही एन वर्मा शेखर बघेले नत्थुजी घरजाळे शंकरजी चामलाटे ऋषिकेश किंमतकर सुमित कोठारी रितेश चौकसे अमोल गाढवे तथा नागरिक उपस्थित होते.