रामटेक पारशिवनीत तयार करावे पर्यटन इंडस्ट्री – पर्यटन इंडस्ट्री देणार-हजारो बेरोजगारांना रोजगार…
निसर्गाने रामटेक व पारशिवनी तालुक्यात भरभरून वनसंपदा बहाल केली आहे.या वनसंपदेचा उपयोग करून या दोन्ही तालुक्यात पर्यटन हब सहजतेने तयार होऊ शकतो आणि यामार्फत हजारो बेरोजगारांना काम सुद्धा देता येईल.यासंदर्भातील अभ्यासू अहवाल भाजपा ग्राम विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ.राजेश ठाकरे यांनी पर्यटन मंत्री मंगलप्रसाद लोढा यांना सादर केला आहे.
त्या अहवालानुसार डॉ.राजेश ठाकरे यांनी दोन्ही तालुक्यांचा अभ्यास करून काही ठळक मुद्द्यांच्या मागणीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. त्यानुसार रामटेक व पारशिवनी तालुक्यातील सर्व ऐतिहासिक व धार्मिक स्थळांचा विकास करणे,त्या ठिकाणी यात्रेकरूंसाठी नागरी सुविधा तयार करणे,श्रीराम मंदिर ते नागार्जुन टेकडीमार्गे खिंडसी पर्यटन मिनी ट्रेन सुरू करणे,पर्यटकांना आकर्षित करणारी सरळ पहाडीवरून उतरणारी व चढणारी अत्याधुनिक फनी कुलर ट्रेन,
पहाडी चा वापर करून वॉटर फॉल,वॉटर पार्क यासारख्या विविध पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या सुविधायुक्त यंत्रणा तयार करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे मनोरंजन पार्क उभारणे,खाजगी उद्योजकांना आमंत्रित करून थ्री स्टार,फाईव्ह स्टार दर्जाचे हॉटेल्स उभारणे,श्री क्षेत्र अंबाळा तलाव खोलीकरण करून त्याचे सौंदर्यीकरण करणे तसेच त्या ठिकाणी यात्रेकरूकरिता सर्व आवश्यक सुविधा तयार करणे,
कालिदास स्मारकास व “मेघदूत” काव्यास जागतिक महत्त्व प्राप्त व्हावे म्हणून महाकवी कालिदास रचित मेघदूत काव्याचा प्रसंग व अगस्ती मुनी आश्रम येथील रामायणातील वनवास प्रसंग या दोन्हीही प्रसंगाचे लेजर शो चे माध्यमातून शो तयार करणे, रामटेक गड मंदिराचा राष्ट्रीय स्तरावर घोषित झालेल्या “रामायण सक्रिट” मध्ये समावेश करणे,पारशिवनीतील घोगरा महादेव,आदिवासी देव कुंवारा भिवसेन,कालभैरव पेठ येथे भक्तनिवास उभारा,
कोलितमारा येथे पेंच नदीवर बोटिंगद्वारे जंगल सफारीसाठी सुविधा द्या,कृषी पर्यटनालाही येथे वाव द्या,नगरधन किल्ला,मनसर उत्खननासंदर्भात प्राचीन संस्कृतीचे भव्य संग्रहालय तयार करावे,मायल अंडरग्राउंड पर्यटन व डब्लूसीएल पर्यटन करिता मंजुरी मिळवून देणे,तसेच रामटेक व पारशिवनी तालुक्यातील सर्व जंगल जंगल सफारी गेट व सफारी अंतर्गत दर्जेदार रस्ते तयार करणे अशी या प्रस्तावातील विकास कामे आहेत .
दररोजचे ४० हजार ते ५० हजार पर्यटक या ठिकाणी यावेत म्हणून विशेष रामटेक टुरिझम सेवा बस,नागपूर ते रामटेक ब्रोडगेज मेट्रो सेवा,रामटेक-पारशिवनी ते मध्यप्रदेश तसेच रामटेक-तिरोडा छत्तीसगड आणि रामटेक-देवालापार ते शिवनी मध्यप्रदेश असा रेल्वे मार्ग उभारा, त्यामार्फत मध्यप्रदेश तसेच छत्तीसगड प्रवासी व यात्रेकरू तसेच पर्यटक यांना जाता येता येईल अशा सेवेची निर्माण करणे,जास्त पर्यटकांच्या संख्येच्या ठिकाणी आदिवासी नृत्य तसेच इतर स्थानिक कलावतांचे कला प्रदर्शनाची सुद्धा मागणी या प्रस्तावात आहे.
अशा विविध मागण्या सहित प्रकल्प अहवाल सादर करण्यात आला.यातून स्थानिक बेरोजगार युवक तसेच रस्त्यावरील छोटे-मोठे दुकानदार,हॉटेल,ढाबा,रेस्टॉरंट सहित ऑटो चालक,जीप चालकांनाही रोजगार मिळावा अशा स्वरूपातील अभ्यासपूर्ण अहवाल उच्च विद्याविभूषित असलेल्या डॉ.राजेश ठाकरे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तयार केला आहे.
हा अहवाल त्यांनी काही महिन्यापूर्वी महाराष्ट्र शासनाकडे पाठवला होता. त्याचीच चर्चा बुधवार ७ डिसेंबर २०२२ रोजी त्यांनी पर्यटनमंत्री मंगलप्रसाद लोढा तसेच संचालक पर्यटन संचालनालय यांच्याशी करून यावर अंमल करावा,व येणाऱ्या अधिवेशनापूर्वी रामटेक पारशिवनी टुरिझम हब संदर्भात बैठक आयोजित करावी अशी विनंती केली.
रामटेक पारशिवनी पर्यटन हब म्हणून मंजुरी मिळाल्यास स्थानिक हजारो हातांना रोजगार मिळेल. पर्यटन इंडस्ट्री मध्ये रोजगार निर्मिती झपाट्याने होते.आज रामटेक, पारशिवनी तालुक्यातील लोकांना रोजगाराची गरज आहे.याकरिता फक्त निसर्गाने दिलेल्या वनसंपदेचा योग्य सदुपयोग केल्यास रोजगार निर्मितीचा फार मोठा चमत्कार येथे घडू शकतो, अशीही भूमिका चर्चेत डॉ.राजेश ठाकरे यांनी मांडली.