रामटेक – राजु कापसे
मानवी जीवनात झाडाचे अमूल्य असे योगदान आहे.एक झाड वाचला तर आपली एक पिढी वाचते अशी म्हण समाजात प्रचलित आहे.अशा वेळी एखाद्या नवनिर्मित करण्यात येणाऱ्या कार्यात जर एखादा झाड शनी म्हणून उभा राहत असेल तर त्याला कापून आपले कार्य सुरू करण्याची पद्धत सद्या आपल्याला बघावयास मिळते.
![mahavoice-ads-english](https://mahavoicenews.com/wp-content/uploads/2024/05/mahavoice-ad-english.jpg)
मात्र आपण लावलेल्या झाडाला नियमित पाणी देऊन आपण त्याला जगवतो,मोठं करतो. याच झाडाला जर कुणी नष्ट करणार असेल तर स्वाभाविकच मन दुखेल.मात्र यावर इतर पर्यायांचा देखील अवलंब करून तो झाड कसा वाचवता येईल याचा एक ज्वलंत उदाहरण नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील कान्द्री परिसरात बघायला मिळाले.
नव्याने सुरू होत असलेल्या पेट्रोल पंपाच्या मार्गाच्या मार्गात अडचण निर्माण करणाऱ्या झाडाला नष्ट न करता त्याला दुसऱ्या ठिकाणी हस्तांतरण करून झाडाला नवीन जीवन देण्याचे कार्य ओरिएंटल टोल प्लाझा खुमारी येथील कर्मचाऱ्यांनी केले आहे.यामुळे त्यांचा सर्वत्र कौतुक होत आहे.
कान्द्री परिसरात नव्याने पेट्रोल पंपाचे बांधकाम कार्य सुरू आहे.पेट्रोल पंपाच्या मार्गात येत असलेल्या झाडाला जेसीबी वाहनांच्या मदतीने काढून त्याला दुसऱ्या ठिकाणी लावण्यात आले.त्यांच्या या प्रयत्नाला यश आले व अखेर अडचण निर्माण करणाऱ्या झाडाला सुखरूप बाहेर काढून त्याला नवीन जीवनदान देण्यात आले.
यावेळी ओरिएंटल टोल प्लाझा येथील व्यवस्थापक अतुल आदमने,आर.पी.ओ. गजेंद्र लोखंडे,मनोज सनोदिया,प्रवीण खरपटे,कुंजीलाल तुमडाम,विजय दिवटे व ओरिएंटल कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.
झाड हस्तांतरण करणे होते मोठे आव्हान…
नव्याने झाड हस्तांतरण करणे हे आमच्यासाठी मोठे आव्हाण होते.या अगोदर इतके मोठे झाड हस्तांतरण आम्ही कधीच केले नाही. त्यामुळे ही चाचणी आमच्यासाठी कठीण स्वरूपाची होती.मात्र सर्व कर्मचाऱ्यांच्या मेहनतीला यश आले व आम्हाला तो झाड तिथून काढून दुसऱ्या ठिकाणी लावण्याला पूर्णपणे यश आले.
या झाडाव्यतिरिक्त आणखी ८ झाडे आम्हाला याच पद्धतीने बाहेर काढून हस्तांतरण करून त्यांना नवीन जीवन द्यायचे आहे.व आम्हाला आशा आहे की जसा हा एक झाड आम्ही काढण्यात व रुजविण्यास यशस्वी झालो त्या प्रमाणेच सर्व झाडे व्यवस्थित काढून ते रुजविण्याचे कार्य तेवढ्याच तत्परतेने करू…