तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी, शिक्षण विभाग,पं.स.काटोलचे आयोजन
नरखेड – अतुल दंढारे
प्रत्येक व्यक्तीच्या अंगी जिज्ञासा वृत्ती असते.विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून सृजनशीलतेला वाव मिळते व नवनवीन प्रयोगाची निर्मिती होते.आजचे बालवैज्ञानिक उद्याचे संशोधक होईल असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी संतोष सोनटक्के यांनी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी दरम्यान जि.प.माध्यमिक शाळा, काटोल येथे केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी संतोष सोनटक्के तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी नरेश भोयर, शाळेचे मुख्याध्यापक अनिल राऊत, केंद्रप्रमुख राजू धवड, एन.सी.सी. मार्गदर्शक प्रमोद कोहळे, मोरेश्वर साबळे, रमेश गाढवे, निळकंठ लोहकरे, नरेंद्र भोयर, महेश राकेश, पांडुरंग भिंगारे प्रामुख्याने उपस्थित होते.
उच्च प्राथमिक गट (वर्ग ६ ते ८) प्रथम क्रमांक भूषण राऊत (जि.प.उच्च प्राथमिक शाळा, मेंढेपठार), द्वितीय क्रमांक प्रज्वल इंगळे(न.प.उच्च प्राथमिक शाळा क्र.२,काटोल) व तृतीय क्रमांक रुद्रव काथोटे (जि.प.उच्च प्राथमिक शाळा, खुर्सापार) तर माध्यमिक व उच्च माध्यमिक गट (वर्ग ९ ते १२) प्रथम क्रमांक मैथिली जुनघरे (लाखोटीया भुतडा कनिष्ठ महाविद्यालय,कोंढाळी), द्वितीय क्रमांक प्रतिक्षा सावरकर (नबीरा कनिष्ठ महाविद्यालय,काटोल) तर तृतीय क्रमांक सिमरन शेख(नगर परिषद हायस्कुल, काटोल) यांनी पटकाविला.
शैक्षणिक साहित्य निर्मिती प्राथमिक शिक्षक गटात गंगाधर गायकवाड (जि.प.उच्च प्राथमिक शाळा,धोटीवाडा), माध्यमिक शिक्षक गटात भोजराजन चंदन (बी.आर.हायस्कूल, काटोल), प्रयोगशाळा परिचर गटात प्रल्हाद जयपूरकर (लाखोटीया भुतडा विद्यालय, कोंढाळी) यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. विज्ञान प्रदर्शनीत सहभागी प्रतिकृतीचे परीक्षण नबीरा महाविद्यालय येथील प्रा.पुष्पराज भुयार, प्रा.लिना मानकर, प्रा.जगदीश शिरस्कर,प्रा.निलिमा पाठे, प्रा.राहुल बनसोड,प्रा.रुपाली तिखे यांनी उत्कृष्टपणे केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरेश भोयर, संचालन निलेश पोपटकर तर आभार प्रदर्शन राजू धवड यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कमलेश सोनकुसळे, गोविंद काळे, योगेश चरडे,रोशन सावरकर, हरेशकुमार खैरे,राजेंद्र बोरकर, सुरेंद्र कोल्हे, नरेंद्र बोढाळे, निळकंठ मदनकर, रामभाऊ धर्मे, आदींनी सहकार्य केले.